जळगाव :- केसीई सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने उच्च माध्यमिक अभ्यासक्रमात समाविष्ट रेडिओजॉकी पाठ्यांशाशी निगडित घटकाशी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष ओळख व्हावी, या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी याची माहिती होण्याच्या दृष्टीने केसीई संस्थेच्या रेडिओ मनभावन ९०.८ एफ.एम.चे संचालक प्रा.श्री.अमोल देशमुख यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रसार माध्यम क्षेत्रात नानाविध रोजगार संधी उपलब्ध असून रेडिओजॉकी हे उत्तम क्षेत्र सध्या युवा पिढीस खुणावत असून यात चांगले करिअर होऊ शकते हे आवर्जून नमूद करताना रेडिओ, आकाशवाणी हे व्यवसाय क्षेत्र निवडायचे असेल तर कोणती पूर्वतयारी अत्यावश्यक आहे, त्यास कोणत्या मर्यादा आहेत अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करत रेडिओजॉकी होण्यास प्राधान्य दिले पाहिजे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.