Raid kuntankhana In lodging ; लॉजिंगच्या नावावर सूरु असलेल्या कुंटणखान्यावर धाड – ५ महिलांची सुटका, दोघांवर गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

एमआयडीसी परिसरात सुरु होता प्रकार

Raid kuntankhana In lodging जळगाव (साक्षीदार न्युज ) : – शहरातील एका हॉटेल व लॉजिंगवर कुंटणखाना सुरु असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यावर त्याठिकाणी छापा टाकनयेत आला आणि यावेळी पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.

- Advertisement -

जळगाव एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये असलेले सागर हॉटेल व लॉज येथे बेकायदेशीर पध्दतीने कुंटणखाना सुरू होता. याबाबतची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार मंगळवार दि. २७ रोजी रात्री ८ वाजता छापा टाकला. या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले. पो कॉ सपना येरगुंटला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेल मालक सागर नारायण सोनवणे रा. जळगाव आणि चालक सागर सुधाकर पाटील या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर, पोलीस नाईक विकास सातदिवे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनंदा तेली, पोहेकॉ मुकुंदा पाटील, रामदास कुंभार, विनोद भास्कर, भरत डोके यांच्यासह इतरांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.

Raid kuntankhana In lodging

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS