साक्षीदार | ९ नोव्हेबर २०२३ | प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मुंबई ते रिवा, पुणे ते जबलपूर आणि जबलपूर ते कोइमतूर या तीन उत्सव विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
क्र. ०२१३१ पुणे – जबलपूर सुपरफास्ट स्पेशल गाडी आता १ जानेवारीपर्यंत तर ०२१३२ जबलपूर- पुणे सुपरफास्ट स्पेशल या गाडीची मुदत आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. क्र. ०२१८८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रिवा सुपरफास्ट स्पेशल गाडी प्रत्येक शुक्रवारी २९ डिसेंबरपर्यंत तर क्र ०२१८७ रिवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट ही स्पेशल गाडी आता २८ डिसेंबरपर्यंत दर गुरुवारी वाढविण्यात आली आहे. क्र. ०२१९८ जबलपूर- कोइम्बतूर स्पेशल गाडी २९ डिसेंबरपर्यंत दर शुक्रवारी तर क्र. ०२१९७ कोईम्बतूर- जबलपूर स्पेशल गाडी १ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.
काचीगुडा येथून मेडचल, वाडियाराम, कामरेड्डी, निजामाबाद १ बसर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशिम, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव नंदुरबार, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, महेसाणा, पालनपूर, अबू रोड, फलना, मारवाड जंक्शन, पाली मारवाड, लुनी, जोधपूर, गोतान, मेडता रोड, नागौर आणि नोखा या स्टेशनवर थांबेल.