राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसासह गारपिटीचा इशारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ३० नोव्हेबर २०२३ ; उत्तर केरळपासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळील ईशान्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून 1.5 ते 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ हवामान असून, थंडीतही वाढ झाली आहे.

- Advertisement -

राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहे. आज नाशिक जिल्ह्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा आहे. तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भात जोरदार वारे, विजा, मेधगर्जनेसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

आज उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि गारपिट होण्याचा इशारा आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात विजांसह पावसाचा ‘यलो अलर्ट’ कायम आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान, विजांसह पावसाची शक्यता आहे. पावसाळी वातावरण, ढगाळ हवामान यामुळे कमाल तापमानात मोठी घट झाली असून, किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये सोलापूर येथे उच्चांकी 33 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर विदर्भातील महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी 14.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS