Chennai PhD Ceremony | भुसावलचे भूषण! सेवानिवृत्त मुख्य अभियंता राजेंद्र बाविस्कर यांना चेन्नईत मानद डॉक्टरेटने गौरव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Chennai PhD Ceremony | साक्षीदार न्यूज | भुसावल थर्मल पावर स्टेशनचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता राजेंद्र (आर. आर.) बाविस्कर यांना चेन्नई येथे आयोजित विशेष समारंभात मानद पीएचडी (डॉक्टरेट इन ऍडमिनिस्ट्रेशन) प्रदान करण्यात आली. साउथ वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या वतीने ही मानद पदवी त्यांना मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आली.

- Advertisement -

राजेंद्र बाविस्कर यांनी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ (एम.एस.ई.बी.) सेवेत सहाय्यक अभियंता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता पदांवर त्यांनी यशस्वीपणे जबाबदाऱ्या पार पाडल्या. आपल्या कार्यकुशलतेच्या आणि प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांनी मुख्य अभियंता पदापर्यंत मजल मारली आणि त्या पदावरून ते सेवानिवृत्त झाले.

प्रशासनातील समृद्ध अनुभव, सामाजिक कार्यातील योगदान, तसेच वाचन आणि वैचारिक क्षेत्रातील व्यासंग यांची दखल घेत विद्यापीठाच्या वतीने त्यांना ही मानद डॉक्टरेट प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.

- Advertisement -

या उल्लेखनीय गौरवाबद्दल विविध सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, तसेच कामगार संघटनांच्या वतीने राजेंद्र बाविस्कर यांचे अभिनंदन करण्यात येत असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .

Chennai PhD Ceremony

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS