Rajput Karni Sena जळगाव | साक्षीदार न्यूज | जागतिक महिला दिन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिन निमित्त जळगाव येथे श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत तसेच जळगाव शहर अध्यक्ष संजना राजपूत यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय राजपूत करणी सेना जिल्हा महिला मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमात महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांनी संघटित राहण्याचे महत्त्व आणि समाजात महिलांची भूमिका यावरही चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अध्यक्ष करणी सेना सारिका पाटील, योगा शिक्षिका ललिता साळवे आणि नगरसेविका माधुरी बारी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे नियोजन संजना पाटील आणि निकिता पाटील यांनी केले.
यावेळी नगरसेविका माधुरी बारी यांनी आपल्या भाषणातून महिलांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. योगा शिक्षिका ललिता साळवे यांनी महिलांना आरोग्यदायी जीवनशैलीसाठी विविध योगा व आरोग्य टिप्स दिल्या.
तसेच श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्षा सौ. सारिकाताई राजपूत यांनी महिलांनी एकत्र येऊन संघटित होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. भविष्यात महिलांचे योगदान समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात अधिक ठळकपणे दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे उदाहरण देत महिलांना प्रगतीसाठी प्रेरित केले.
या कार्यक्रमाला मीनाताई पाटील, दीपाली राजपूत, निकिता पाटील, रत्नमाला पाटील, धनश्री राजपूत, कविता पाटील, शितल पाटील, माधुरी पाटील, संजना पाटील, शितल राजपूत, सोनाली राजपूत, वैशाली राजपूत, प्रतिभा राजपूत आदी महिलांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थित महिलांनी विशेष मेहनत घेतली.








