भुसावळ ; – काही दिवसांपूर्वी राजपूत समाजाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या सुषमा अंधारे यांचा समस्त राजपूत समाज तर्फे निषेध करण्यात आला होता तसेच त्यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या राजीनामाची मागणी समस्त राजपूत समाजातर्फे करण्यात आली होती व सुषमा अंधारे यांची भूमिका ही वैयक्तिक आहे की पक्षाची आहे असे देखील महाजन सर यांना समाजातर्फे विचारण्यात आलेले होते समाधान महाजन सरांनी समाजासाठी उबाठाच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देऊन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शिंदे गटात प्रवेश केला त्यानिमित्त समस्त राजपूत बांधवांनी त्यांच्या सत्कार देखील केला व समाजाचा अभिमान जागा ठेवला यावेळी करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत, जिल्हाध्यक्ष संदीप राणा, प्रदेश प्रवक्ते राजेंद्र सिंग राजपूत, आनंदा पाटील,गणेश पाटील, देवेद्र राजपूत, आकाश राजपूत,दीपक राजपूत,गोकुळ राजपूत,ऋषिकेश पाटील,जय राजपूत,भागवत राजपूत,जयवन्त चौधरी, किरण राजपूत, प्रशांत ठाकूर व समस्त समाज बांधव उपस्तित होते.