मुक्ताई नगर ;– रावेर लोकसभा” क्षेत्र “भाजपा व महायुती” अधिकृत उमेदवार म्हणुन आज नामनिर्देशन अर्ज सादर करणार असून, त्यानिमित्त कोथळी येथे रक्षाताई खडसे यांनी आदिशक्ती मुक्ताई, विठ्ठल रुखमाई, भवानी देवी” तसेच मुक्ताईनगर येथे श्री स्वामी समर्थ केंद्र येथे दर्शन घेऊन सासरे एकनाथराव खडसे यांचे आशीर्वाद घेतले .
- Advertisement -
आज दुपारी जळगावात भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रावेर व जळगाव महायुतीचे उमेदवार आपले अर्ज दाखल करणार आहेत. भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
- Advertisement -