Police ; रामानंद पोलिसांची मोठी कारवाई : अवघ्या चार तासात लावला चोरट्यांचा तपास !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Police

साक्षीदार | १२ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या सेंट्रल बँक कॉलनीतील एक परिवार अंत्यसंस्कारासाठी गावी गेल्याची संधी साधत बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मंगळवारी रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तासाभरात चार संशयित चोरट्यांच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील सेंट्रल बँक कॉलनीमध्ये प्रशांत गणेश माहोरे हे वास्तव्यास आहेत. दि. ३ ऑक्टोंबर रोजी त्यांची आजी वारल्याने ते कुटुंबियांसह अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथे गेले होते. काही दिवस त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरटयांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून त्यांच्या घरातील रोकड आणि सोने चांदीच्या दागिने असा एकूण २६ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवून नेला. दि. ५ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास गणेश माहोरे हे घरी येण्यासाठी निघाले असता, त्यांना लहान भावाने फोन करुन घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यामुळे गणेश माहोरे यांनी घराकडे धाव घेतली. घरी आल्यानंतर माहोरे यांना घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. लोखंडी कपाट तोडून लांबविला ऐवज चोरट्यांनी किरण माहोरे यांच्या घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. तसेच त्यांच्या घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून त्यामध्ये ठेवलेली रोकड आणि सोने चांदीचे दागिने चोरुन नेले.

याप्रकरणी मंगळवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जणांनी ही घरफोडी केल्याची माहिती पोहेकॉ सुशिल चौधरी यांना मिळाल्यानंतर संशयित सागर राजाराम गवई (वय २३, रा. पिंप्राळा हुडको), अब्रार अमित खाटीक (१८, रा. उस्मानिया पार्क), समीर शेख इकबाल (२२, दूध फेडरेशन हुडको) व अमोल प्रकाश शिरसाठ (२५, रा. दूध फेडरेशन हुडको) यांना तासाभरात अटक केली.

- Advertisement -

यांनी केली कारवाई

ही कारवाई रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पो. नि. शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सुशिल चौधरी, संजय सपकाळे, राजेश चव्हाण, हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सुर्यवंशी, रविंद्र चौधरी, जुलालसिंग परदेशी यांच्या पथकाने केली.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS