MLA Suresh Damu Bhole | “आमदार साहेब, आश्वासन पाळा, नाहीतर जिवंतपणीच तिरडीवर झोपू!” – जळगावच्या रामेश्वर कॉलनीतील रहिवाशांचा संतापजनक इशारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

MLA Suresh Damu Bhole  जळगाव | साक्षीदार न्यूज | रामेश्वर कॉलनी परिसरातील विविध प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी स्थानिक नागरिकांनी आमदार सुरेश दामु भोळे यांना निवेदन देत लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच समस्यांचा निपटारा न झाल्यास २३ मार्च २०२६ पर्यंत जिवंतपणे तिरडीवर झोपून अंत्ययात्रा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

- Advertisement -

निवेदनात नमूद केल्यानुसार, जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या दरम्यान झालेल्या भेटीत आमदार सुरेश दामु भोळे यांनी रामेश्वर कॉलनीतील काही महत्त्वाच्या समस्यांचा कायमस्वरूपी निपटारा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्या समस्या अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नागरिकांनी मांडलेल्या प्रमुख समस्या

- Advertisement -

निवेदनात पाच प्रमुख प्रश्न मांडण्यात आले

1️⃣ एमआयडीसी भूखंड क्र. डी ४५/२ येथून कामगारांसाठी रस्ता उपलब्ध करून देणे.
2️⃣ मेहरूण स्मशानभूमीचे सुशोभीकरण करणे.
3️⃣ गट नंबर २५० मधील हनुमान मंदिराजवळील ओपन प्लेसचे सुशोभीकरण.
4️⃣ छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी जागा राखीव करून शासनाकडून निधी उपलब्ध करून देणे.
5️⃣ गट नं. २४९ एमडीएस कॉलनी, शिवदत्त मंदिराजवळील ओपन स्पेसला संरक्षण भिंत उभारणे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, या सर्व समस्या दीर्घकाळापासून प्रलंबित असून त्यावर तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे.

आंदोलनाचा इशारा

निवेदनात नागरिकांनी स्पष्ट केले आहे की, २३ मार्च २०२६ पर्यंत या मागण्यांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्यास “जिवंतपणे तिरडीवर झोपून अंत्ययात्रा काढण्याचे आंदोलन” करण्यात येईल.

या निवेदनावर परिसरातील त्रस्त नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून आपला रोष व्यक्त केला आहे. त्यामध्ये ज्ञानेवर झारपातम, एस.आर. जगताप, संदीप प्रकाश मांडोळे, संजय सांडू सपकाळे, हर्षल वाणी, भाऊसाहेब पाटील, खांबेटे उमेश निबाजी, महेश वासुदेव, सचिन वाद्य आदी नागरिकांचा समावेश आहे.

रामेश्वर कॉलनीतील नागरिकांच्या या इशाऱ्यानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या प्रश्नांवर काय भूमिका घेतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

चोपडा तालुक्यातील अकुलखेड्यात थरार! इन्स्टाग्रामवरील प्रेम प्रकरणाचा रक्तरंजित अंत! 😱
तलाठी कार्यालयात आमने-सामने! शाब्दिक वादाचा व्हिडिओ रेकॉर्ड, प्रकरण पोलीस ठाण्यात
“वाळू माफियांसमोर प्रशासन शरण? जळगावात पुन्हा जीव गेला, नागरिकांचा थेट सवाल!”

MLA Suresh Damu Bhole

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Music Award Pune | पुण्यात संगीतकार शिवराज साने यांचा...

Music Award Pune पुणे | साक्षीदार न्यूज | दैनिक साहित्य लीला पंढरी, पुणे यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला....

Revenue Samadhan Camp Jalgaon | “शासन जनतेच्या दारी” —...

Revenue Samadhan Camp Jalgaon जळगाव |साक्षीदार न्यूज | छत्रपती शिवाजी महाराजांच्या “रयतेचा राजा म्हणजे रयतेची सेवा” या विचारातून प्रेरणा घेत शासन आज जनतेच्या दारी...

Cleanliness City  | “माझे शहर माझी जबाबदारी” मोहिमेत नागरिकांचा...

Cleanliness City  जळगांव | साक्षीदार न्यूज | वार्ड क्र. 8 , दांडेकर हॉल प्रभाग 1,सिटी कॉलनी “माझे शहर माझी जबाबदारी” या उपक्रमांतर्गत सिटी कॉलनी...

RECENT NEWS