रथोत्सवात चोरट्यांचा धिंगाणा : तीन महिलांच्या सोन्याच्या पोत लंपास !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २६ नोव्हेबर २०२३ | रथोत्सव पाहण्यासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातून चोरट्यांनी पोत लांबवल्याची तीन घटना उघडकीस आल्या आहे. याप्रकरणी महिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिकी एकादशिनिमीत्त शहरातून रथ काढण्यात आला होता. रथाचे दर्शन घेण्यासाठी जिल्हाभरातून भाविक जळगावात दाखल झाले होते त्यामुळे सायंकाळच्या सुमारास प्रचंड गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत शहरातील दाणा बाजार परिसरात दर्शनासाठी आलेल्या पूनम भूषण कोळी (वय २३, रा. दीनकर नगर, असोदा रोड) या विवाहितेच्या गळ्यातून ८ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरट्याने चोरुन नेली. त्याच परिसरात रामेश्वर कॉलनी येथील पाणीपुरवठा ऑफिजवळ राहणाऱ्या तनूजा रविंद्र भोई यांच्या गळ्यातून २ ग्रॅम वजनाची लांबवली. तसेच शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील सिमा प्रशांत पाटील यांच्या गळ्यातून चोरट्याने चार ग्रॅम सोन्याची पोत चोरुन नेली. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविल्याच्या तीन घटना उघडकीस आल्या. त्यामुळे रथोत्सवात चोरट्यांची दिवाळीच साजरी झाली आहे. याप्रकरणी महिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन मंगलपोत चोरीच्या घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी एकमहिलेस दोन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी केली जात आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS