Raver Honey Trap | रावेर हनी ट्रॅप प्रकरणात 100 हून अधिक जण ,अनेकांनी आत्महत्या केल्याचा संशय ?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Raver Honey Trap साक्षीदार न्युज । सुनिल भोळे । जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील हनी ट्रॅप प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडवली आहे. या प्रकरणात चोपडा तालुक्यातील लोणी अडावद येथील एका महिलेने एका प्रतिष्ठित धनाढ्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचा व्हिडिओ चित्रित करून त्या आधारे ब्लॅकमेल करत तिने लाखो रुपये उकळले असल्याचे बोलले जात आहे . या घटनेने जिल्ह्यात चर्चेला चांगलाच जोर वाढला असून, या महिलेच्या मोहजालात आणखी बरेच जण अडकल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

पोलिस तपासातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सदर महिलेने रावेर शहरातील 43 वर्षीय व्यक्तीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आतापर्यंत 11 लाख रुपये उकळले. इतकेच नव्हे, तर तिने 5 कोटी रुपये हातउसने घेतल्याच्या खोट्या पावतीचा नोटरी करारनामा 21 फेब्रुवारी 2025 रोजी या व्यक्तीकडून करवून घेतला. ब्लॅकमेलिंगच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर या प्रतिष्ठित व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी प्रतिभाला अटक केली, तसेच तिचा मुलगा निर्मल चुन्नीलाल पाटील ( वय 21) यालाही ताब्यात घेतले.

पोलिसांनी या महिलेचा मोबाइल जप्त केला असून, त्यातून अनेक अश्लील व्हिडिओ, फोटो आणि संभाषणांचे पुरावे हाती लागले असलायची देखील चारचा आहे . तपासातून असे दिसून आले की, या महिलेच्या मोहजालात रावेर शहर व परिसरातील सुमारे 100 हून अधिक प्रतिष्ठित आणि धनाढ्या व्यक्ती अडकल्या आहेत. यामध्ये व्यापारी, डॉक्टर, वकील, सरकारी अधिकारी, माजी नगरसेवक, वन व पोलिस विभागाचे काही कर्मचारी, व्यावसायिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या यादीत एक मोठे नाव असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. हे मोठे नाव कोणाचे, याबाबत परिसरात उत्सुकता वाढली असून, लवकरच ही नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

- Advertisement -

या हनी ट्रॅपमुळे अनेकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहितीही समोर येत आहे. पोलिस तपासात असे संकेत मिळाले आहेत की, ब्लॅकमेलिंगच्या तणावाखाली अनेकांनी आपले जीवन संपवले असावे. ही महिला एकटीच हे कृत्य करत होती की तिच्यासोबत आणखी कोणी सहभागी होते, याचा तपास सुरू आहे. तसेच, मध्यस्थी करणारे दलाल कोण आणि प्रतिष्ठित व्यक्तींची माहिती पुरवणारे कोण, याबाबतही पोलिस कसून चौकशी करत आहेत.

या प्रकरणाची चर्चा रावेर शहर व परिसरात ठिकठिकाणी सुरू असून, शासकीय कार्यालयांमध्येही या विषयावर चवीने चर्चा रंगत आहे. पोलिस तपासात आणखी नवनवे खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या महिलेच्या मोहजालात आणखी कोण कोण अडकले, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हे प्रकरण आता नवीन वळण घेताना दिसत असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती उघड होण्याची अपेक्षा आहे.

क्रमश:

 

Raver Honey Trap

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS