back to top
शुक्रवार, सप्टेंबर 26, 2025

रवी कापडणे यांची शिंदे सेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान

- Advertisement -

जळगाव( sakshidar news) ; – शिवसेना नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी महत्वाचा निर्णय घेत रवींद्र कापडणे यांची उपजिल्हाप्रमुख पदी निवड केली आहे. कापडणे यांची पक्षासाठीची मेहनत, कार्यकुशलता आणि कार्यकर्त्यांमधील विश्वासार्हता लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. गुलाबराव पाटील यांनी कापडणे यांचे अभिनंदन करताना म्हटले, “रवींद्र कापडणे हे पक्षाच्या जेष्ठ कार्यकर्त असून त्यांची नवी जबाबदारी पक्ष संघटनेला अधिक बळकट करेल असा विश्वास शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

जळगाव शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत तालुक्यातील वावडदा येथिल जेष्ठ कार्यकर्ते माजी सरपंच रवींद्र कापडणे यांची शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली असून शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रवी कापडाने यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्तें त्यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

- Advertisement -

यावेळी रवींद्र कापडणे म्हणाले की, मंत्री “गुलाबराव पाटील यांनी दाखविलेला विश्वास आणि ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन. शिवसेनेच्या ध्येयधोरणानुसार कार्य करताना सर्व कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचा आणि पक्षवाढीला अधिक चालना देण्याचा माझा प्रयत्न असेल.” परिसरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख शिवराज पाटील, विधासभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे, मा. जि. प. सदस्य पवन सोनवणे, दुध संघाचे रमेशअप्पा पाटील, महेंद्रसिंग जैन सचिन पाटील, माजी सरपंच बबनदादा पाटील, सचिन पाटील, सुधाकर येवले, कोमल पवार, विक्रम पवार यांनी अभिनंदन केले असून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

म्हसावद येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे सेनेत प्रवेश
काल म्हसावद येथील ओम साई गजानन ग्रुप भजनी मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर मोरे, दुर्गेश हुजरे, डॉ. घनश्याम पोरवाल यांच्यासह सुमारे दीडशे सदस्य तसेच माजी उप सरपच फारूक भाई पटेल, सोसायटीचे माजी व्हाईस चेरमन ताहेर देशपाडे, विकास सोसायटी शरीफ दादा खाटीक हजरत मलगशा बाबा उत्सव समिती प्रमुख रज्जाक दादा पटेल, आसिफ भाई देशमुख, हबीब भाई पठान रहुप दादा मनियारयांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हाती भगवा झेंडा घेवून प्रवेश केला. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेना झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी सरपंच गोविंदा पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

ACB Pollution Control Board | प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याचा...

ACB Pollution Control Board | साक्षीदार न्यूज | जळगावमध्ये मोठी कारवाई करत लाच घेताना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्र अधिकाऱ्याला एसीबीने अटक केली आहे. प्रमाणपत्रासाठी...

RECENT NEWS