आरबीआयने पुन्हा दिला तीन बँकेना कोट्यावधीचा दंड !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २५ नोव्हेबर २०२३ | देशात गेल्या काही वर्षापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अनेक बँकेवर कारवाई करीत आहे. शुक्रवारी आरबीआयने मोठा निर्णय घेतला असून बँकेने सिटी बँक, बँक ऑफ बडोदा आणि इंडियन ओव्हरसीज बँक या ३ मोठ्या बँकांना कोट्यवधींचा दंड ठोठावला आहे. तब्बल १०.३४ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. याबाबत आरबीआयने माहिती दिली आहे.

- Advertisement -

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, सिटी बँकेवर ठेवीदार शिक्षण आणि जागरुकता निधी योजनेशी संबंधित निकषांचे पालन न केल्याप्रकरणी आणि वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगवरील आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. आरबीआयने सिटी बँकसह बँक ऑफ बडोदालाही दंड आकारला आहे. डिपॉझिटरी ऑफ लार्ज कॉमन एक्स्पोजर निर्मितीसंबंधित काही निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ कोटीचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहितीही देण्यात आली.

बँक ऑफ बडोदानंतर इंडियन ओव्हरसीज बँकेलाही दंड ठोठावला आहे. चैन्नईतील या बँकेला कर्ज आणि अॅडव्हान्सच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल १ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या तिन्ही प्रकरणांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने माहिती दिली. नियंमाचे पालन न झाल्याप्रकरणी हा दंड आकारण्यात आला आहे. बँकानी ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करण्याचा हेतू नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS