आरबीआयने घेतला मोठा निर्णय : पर्सनल लोन झाले कठीण !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १७ नोव्हेबर २०२३ | जगभरात कोरोनाचे संकट आल्यावर अनेक लोकांना पर्सनल लोन घेवून आपली गरज भागविली होती. सर्व सामान्य माणूस मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असेल तेव्हा पर्सनल लोनचा आधार घेतो. परंतु, आता पर्सनल लोन घेणं कठीण होणार आहे.

- Advertisement -

भारतीय रिझर्व्ह बँकेने क्रेडिट कार्ड नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. क्रेडिट कार्डवर कर्ज घेताना शेड्युल्ड कमर्शियल बँका आणि NBFCs द्वारे रकमेची मर्यादा वाढवण्यात आली आहे. ज्यामुळे वैयक्तिक कर्ज घेणे महाग होणार आहे.

RBI ने ग्राहक क्रेडिटवरील रिस्क वेट १०० टक्क्यांवरुन १२५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. याचा अर्थ असा की, यामध्ये २५ टक्क्यांना वाढ करण्यात आली आहे. पूर्वी बँकांना प्रत्येक १०० रुपये कर्जासाठी ९ रुपये भांडवल राखणे आवश्यक आहे. परंतु, या किमतीत सध्या वाढ झाली आहे. आता यावर ११.२५ रुपये ठेवण्यात येतील. क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी RBI आणि NBFCs याची रिस्क वेट १०० टक्क्यांपेक्षा कमी आहे. ज्यांमुळे बँक कर्जावरील रिस्क रेट वाढवला आहे. यामध्ये गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज आणि वाहन कर्ज तसेच सोने-चांदीच्या दागिन्यांवर हे कर्ज लागू होणार नाही.

- Advertisement -

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी म्हटले की, क्रेडिट कार्डवरील कर्जांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यांनी कमर्शियल आणि बँकिंग वित्तीय कंपन्यांना त्यांच्या अंतर्गत देखरेखीत वाढत्या जोखीमला सामोरे जाण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये मायक्रो फायनान्स कर्ज आणि बचत गटांना देण्यात आलेले कर्जाचे टक्केही वेगळे ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS