साक्षीदार | ११ ऑक्टोबर २०२३ | देशभरातील अनेक तरुण बेरोजगार असून त्यांच्यासाठी केद्र सरकार व राज्य सरकार नेहमीच विविध पदासाठी भरती आणत आहेत. सध्या अनेक दिवसांपासून रेल्वे विभागात भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे भरतीसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे.
रेल्वेच्या सर्व झोनमध्ये 2.4 लाख ग्रुप सी पदे रिक्त आहेत. रेल्वे विभागाकडून लवकरच ही भरती केली जाणार आहे. रेल्वे विभागाने अलीकडेच काही रिक्त पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यासाठी कसा आणि कुठे अर्ज करायचा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. रेल्वे विभागात मुख्यत्वे सेफ्टी स्टाफ, असिस्टंट स्टेशन मास्टर (ASM), नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) आणि तिकीट कलेक्टर पदांची भरती केली जाणार आहे. भारतीय रेल्वे बोर्डाकडून गटांनुसार ही भरती केली जात आहे. रेल्वे विभागामध्ये, सर्व पदांचे दोन मुख्य गटांमध्ये वर्गीकरण केले आहे, पहिले राजपत्रित, गट ‘अ’ आणि ‘ब’ पदांचा समावेश आहे. दुसरे अराजपत्रित, गट ‘क’ आणि ‘ड’ पदांचा समावेश आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका प्रश्नाचे लेखी उत्तर देताना महत्वाची माहिती दिली. यानुसार रेल्वेच्या सर्व झोनमध्ये गट क पदांवर 2 लाख 48 गडार 895 पदे रिक्त आहेत. तर गट अ आणि ब पदांमध्ये 2070 पदे रिक्त आहेत. नोटिफिकेशननुसार एकूण 1 लाख 28 हजार 349 उमेदवारांना गट ‘C’ पदांसाठी (स्तर-1 वगळता) निवडण्यात आले आहे. अधिसूचनेनुसार, लेव्हल-1 पदांसाठी एकूण 1 लाख 47 हजार 280 उमेदवार निवडले गेले आहेत. भारतीय रेल्वेवरील गट ‘अ’ सेवांमध्ये थेट भरती प्रामुख्याने UPSC द्वारे केली जाते.
रेल्वे विभागाने अलीकडेच RPF मध्ये 9739 कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर, 62907 ग्रुप डी पदे, 27019 असिस्टंट लोको पायलट (ALP) आणि टेक्निशियन ग्रेड पदे, 798 RPF रिक्त जागा आणि 9500 RPF रिक्त पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे. गट अ श्रेणीमधील पदे UPSC द्वारे आयोजित स्पर्धात्मक परीक्षांद्वारे भरली जातात. म्हणजेच नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा आणि एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षेमार्फत येथील उमेदवारांची निवड होते. गट ब मधील फक्त गट ‘क’ रेल्वे कर्मचाऱ्यांनाच सेक्शन अधिकाऱ्यांकडून श्रेणी-सुधारित पदांमध्ये जोडले जाते.
असा करा अर्ज
रेल्वेच्या रिक्त पदांवरील भरतीसाठी अर्ज करताना सर्वप्रथम तुम्हाला रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट Indianrailways.gov.in वर जा. येथे RRB Region, RRC किंवा मेट्रो रेल्वे सारखे पर्याय उपलब्ध असतील.यातील तुमचा पर्याय निवडा. पुढे, भरती सेक्शनमध्ये जा आणि दिलेल्या सूचनेचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी पुढे क्लिक करा आणि अर्ज योग्यरित्या भरा. अर्ज करताना आधार कार्ड तपशील भरा. यानंतर अर्ज शुल्क भरा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.