साक्षीदार | २ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक तरुण तरुणी सरकारी नोकरीचे स्वप्न बघत असतांना अनेक परीक्षा देखील देत असतात, याच तरूणासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आता तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवू शकता. महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागात तब्बल 4 हजार 497 पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, याठिकामी वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक पदे भरली जाणार आहेत. या विविध पदांच्या एकूण 4497 रिक्त जागा भरण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. या पदाअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 25 हजार 500 ते 1 लाख 42 हजार 400 रुपये इतका पगार दिला जाणार आहे. यासोबत त्यांना सरकारी नियमानुसार महागाई भत्ता आणि इतर भत्तेदेखील दिला जाणार आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. जलसंपदा विभागातील भरतीची अर्ज प्रक्रिया 3 नोव्हेंबरपासून सुरु होत असून उमेदवारांना 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे. यासाठी बातमीखाली लिंक देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास, चुकीची कागदपत्रे आढळल्यास अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.