Crime News; धक्कादायक ; अनैतिक संबंधांचा संशय, पतीने पत्नीसह चौघांना संपवलं

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Crime News ; अनैतिक संबंधांचा संशयामुळे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे एका नराधम पतीने आपल्या सासरवाडीत जाऊन चौघांचा खून केला आहे . यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तिरझडा या गावातील हि घटना आहे .मंगळवारी (१९ डिसेंबर) रात्री ११ वाजेच्या सुमारास गावात हि घटना घडली. कौटुंबिक वादातून एकाच परिवारातील चौघांची हत्या करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

यांची झाली हत्या
पंडित भोसले (सासरा) सुनील पंडित भोसले (मेहुणा) ज्ञानेश्वर पंडित भोसले (मेहुणा), रेखा गोविंदा पवार (पत्नी) अशी यांची हत्या करण्यात आली आहे . यात रुखमा पंडित भोसले या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

याप्रकरणी पोलिसांनी (Police) नराधम जावाई गोविंदा वीरचंद पवार (रा. कळंब), याला अटक करण्यात आलीआसून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला गोविंदा याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्यामुळे हे हत्याकांड केले आहे . संशय घेत असल्यामुळे पत्नीसोबत नेहमीच भांडण हात असे भांडनानंतर म्हणून गोविंदाची पत्नी माहेरी निघून गेली होती. याचा राग मनात आल्याने आरोपी गोविंदाने मंगळवारी रात्री ११ वाजता सासरवाडी गाठली. आणि तिरझडा गावात गेल्यानंतर आरोपीने बायको, सासू-सासरे आणि दोन मेहुण्यांची निर्घृणपणे हत्या केली.

- Advertisement -

या चौघांची हत्या केल्यानंतर आरोपी गोविंदा हा फरार झाला होता. पोलिसांनी लगेचच आपली यंत्रणा फिरविली आणि आरोपीला अटक केली आहे. चारित्र्याच्या संशयातून एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिकचा तपास यवतमाळ पोलीस करीत आहेत.

Crime News

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS