केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा : आज असेल अखेरची मुदत !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ३ नोव्हेबर २०२३ | प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत फळ पीक विमा योजनेत केळी पिकाचा विमा भरण्यासाठी राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना ३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

- Advertisement -

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये केळी या पिकाचा विमा भरण्यास ३१ ऑक्टोबर २०२३ ही अंतिम मुदत देण्यात आली होती ३१ ऑक्टोबरपर्यंत सुमारे ४५ हजार ७३१ अर्जदारांनी केळी पिकासाठी विमा योजनेत सहभाग घेतला होता. तांत्रिक अडचणींमुळे काही केळी उत्पादक शेतकरी या योजनेत ठरावीक वेळेत सहभागी होऊ शकले नव्हते. त्यामुळे मुंडे यांनी केंद्राकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती. अखेर धनंजय मुंडे यांची ही विनंती केंद्राकडून मान्य करण्यात आली असून, केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी आता ३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS