जनतेला दिलासा : डाळीसह भाजीपाला झाला स्वस्त 

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ११ ऑक्टोबर २०२३ | देशात येत्या वर्षात अनेक निवडणुका तर दुसरीकडे दिवाळीचा उत्सव देखील येत आहे. त्यामुळे केद्र व राज्य सरकार महागाईमध्ये थोडीफार घट केल्याने जनतेला तूर्त दिलासा मिळत आहे. सणांआधीच काही वस्तूंच्या किंमती कमी झाल्या आहेत. महागाईनं दिलासा दिला आहे. सध्या डाळी आणि भाजीपाला स्वस्त झाला आहे. महिन्याभरात डाळी आणि भाजीपाल्यांची किंमती चार टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

- Advertisement -

 

गेल्या महिनाभरात विविध डाळींच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. घटलेली मागणी, वाढलेली आयात आणि विविध सरकारी उपाययोजनांमुळे डाळी स्वस्त झाल्या आहेत. गेल्या महिनाभरात डाळींच्या किमती चार टक्क्यांनी घसरल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

- Advertisement -

डाळींच्या किंमतीबाबत इंडियन पल्सेस अँड ग्रेन्स तअसोसिएशनच्या हवाल्याने इकॉनॉमिक्स टाईम्सच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या एका महिन्यात डाळींच्या किमती 4 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. आफ्रिकेतून तुरीच्या डाळीची वाढलेली आयात, कॅनडातून मसूर डाळीची वाढलेली आवक, सरकारने साठा मर्यादेवर केलेले कडक धोरण, हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात विक्री आणि चढ्या दराने घटलेली मागणी यामुळं डाळींच्या किंमतीत घट झाली आहे. या याबाबातची माहिती व्यापारी संघटनेनं दिली आहे.

इंडियन फार्मसी ग्रॅज्युएट्स असोसिएशनच्या मते, सध्या बाजारात तुरीच्या डाळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. या डाळिच्या किंमती एका महिन्यात चार टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. त्याची किंमत कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे ट्रेडर्स आणि प्रोसेसरसाठी स्टोरेजची कमाल मर्यादा. तुरीच्या डाळीचे दर आणखी कमी होम्याची शक्यता आहे.

तुरीच्या डाळीबरोबरच गेल्या महिनाभरात मसूर आणि हरभऱ्याची डाळ देखील स्वस्त झाली आहे. हरभऱ्याच्या डाळीच्या दरात चार टक्क्यांची घसरण झाली आहे. याशिवाय मसूर डाळ दोन टक्क्यांहून अधिक स्वस्त झाली आहे. सरकार नाफेडच्या माध्यमातून चणाडाळ स्वस्तात विकत आहे. त्यामुळं हरभरा डाळीचे दरही आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मसूराच्या बाबतीतही अशीच चिन्हे दिसत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS