Education Minister Government of Rajasthan ; अक्कलकुवा (साक्षीदार न्युज) ; – आज नंदुरबार जिल्हा भारत आदिवासी पार्टीच्या वतीने अक्कलकुवा तहसीलदार श्री. दिलीप गांगुर्डे यांच्यामार्फत राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले कि, राजस्थान सरकारचे शिक्षण मंत्री श्री मदनलाल दिलावर यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की “जे आदिवासी समाजातील लोक हिंदू धर्मावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांची सर्व डीएनए चाचणी केली जाईल आणि त्यांच्या वडिलांचा शोध घेतला जाईल. “अशा प्रकारची टिप्पणी केल्याने आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहे.
👉🏽 Orion English Medium State Board शाळेच्या विरुद्ध शिक्षकाचे आमरण उपोषण
आदिवासी समाजाची स्वतःची संस्कृती, परंपरा आणि बोलीभाषा प्राचीन काळापासून आहे जी इतर सर्व धमपिक्षा वेगळी आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४२ च्या व्याख्येनुसार अनुसूचित जमातीची विशिष्ट ओळख, परंपरा आणि बोलीचा उल्लेख केला आहे, असे असतानाही आदिवासी समाज सर्व धर्माचा आदर करतो कारण कालांतराने आदिवासी समाजाने शांततापूर्ण, अहिंसक आणि सहकार्याची वृत्ती अंगीकारली आहे त्यामुळे सर्व धर्माच्या गुरूनी आदिवासींना आकर्षित केले आहे याचा अर्थ आम्ही आदिवासी कोणत्याही धर्माचे आहोत असाहोत नाही 5 जानेवारी 2011 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात, केस क्रमांक 10367 आणि 2010 आणि हिंदू विवाह कायदा 1955 मध्ये, हिंदू विवाह कायदा अनुसूचित जमातींना लागू होणार नाही, असे स्पष्टपणे नमूद केले होते कारण आम्हा आदिवासींची संस्कृती, परंपरा आणि विवाह संस्कार सर्व धर्मापेक्षा वेगळे आहेतयाचा अर्थ. स्पष्ट आहे की, आदिवासी समाज कोणत्याही धर्माचे भाग नाही आदिवासी समाजाचे पूर्वज अंत्यसंस्काराच्या वेळी किंवा निसर्गाचे आभार मानण्यासाठी कोणी भेटले तेव्हा शुभेच्छा म्हणून ‘जोहार’ म्हणायचे आणि ते आजही आहे
शिक्षणमंत्र्यांना आदिवासीसाठी केलेल्या घटनात्मक तरतुदींची माहिती नाही ना त्यांना आपल्या संस्कृतीची माहिती आहे. शिक्षणमंत्री असताना त्यांनी आमच्या समाजाच्या शिक्षण पद्धतीबद्दल कधीच बोलले नाही आणि आमच्या डीएनए चाचणीबद्दल ते बोलत आहेत. अशी भडकाऊ भाषा वापरून आमची श्रद्धा आणि ओळख दुखावली गेली आहे. आमची राजस्थान मा. मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की, शिक्षणमंत्र्यांना तात्काळ त्यांच्या पदावरून हटवावे व आदिवासी समाजाची जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी. आमच्या मागण्यांवर सकारात्मक पुढाकार न घेतल्यास भविष्यात संपूर्ण समाज संघटित होऊन तुमच्या पक्षाला विरोध करेल, सक्त नोंद घेण्यात यावी. अक्कलकुवा तहसीलदार श्री. दिलीप गागुर्डे यांना निवेदन देताना भारत आदिवासी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रुपसिंग टी. वसावे, उपाध्यक्ष खेमसिंग वळवी, प्रदेश युवाध्यक्ष साया वसावे, जिल्हा युवाध्यक्ष अॅड. कुशल बसावे, श्री. भिमसिंग पाडवी, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष, अर्जुन पाडवी अक्कलकुवा युवाध्यक्ष, कृपाल पाडवी युवाध्यक्ष तळोदा, अॅड. रूपसिंग तडवी, श्री. अंतरसिंग पाडवी, श्री. महेंद्र पाडवी, श्री. विवेक वसावे, सुनिता वसावे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








