साक्षीदार |२ नोव्हेबर २०२३ | राज्यभर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन होत आहे. तर दुसरीकडे 5 नोव्हेंबर रोजी सांगलीत होणारा अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला याचा चांगलाच फटका बसला आहे. राज्यात सुरु असलेल्या आंदोलनामुळे संमेलाच्या मुहूर्तमेढिचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. तसेच नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष सुधीर गाडगीळ यांनी आंदोलनामुळे राजीनामा दिला आहे. त्यामुळे नाट्यसंमेलन पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वास्तविक अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची सर्वच रंगकर्मी आणि नाट्यरसिक आतुरतेने वाट पाहत असतात. गेल्या तीन वर्षांपासून केवळ चर्चा सुरु होती.
मात्र, यंदा हे संमेलन होईल, असे वाटत होते. मात्र, आता हे नाट्यसंमेलन पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. नाट्यसंमेलन स्वागताध्यपदी असणाऱ्या सुधीर गाडगाळ यांनी राजीनामा दिल्याने मुहूर्तमेढ लांबणीवर पडली आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी संमेलन स्वागताध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. या विषयी बोलताना सुधीर गाडगीळ म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असेलल्या आंदोलनाला यापूर्वीच आम्ही पाठिंबा दिला आहे. राज्य सरकार टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा लढा यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रत्यनशील आहोत. अशा परिस्थितीत स्वागताध्यक्षपद भूषवणे योग्य वाटत सल्याचे गाडगीळ यांनी म्हटले आहे.