back to top
रविवार, एप्रिल 20, 2025

मनुर परिसरातून रोहिणी खडसे यांना मताधिक्य देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला हि ओळख कायम ठेवा – रविंद्र भैय्या पाटिल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बोदवड (सुनिल भोळे ) ; – मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांनी बोदवड तालुक्यातील कुऱ्हा हरदो,मनुर खु, मनुर बु, शेवगा खु, धोनखेडा, लोणवाडी, शेलवड येथे प्रचार रॅली काढून मतदारांच्या भेटी घेऊन मतदारांशी संवाद साधुन विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी प्रचार दौऱ्यात जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांची प्रमुख उपस्थिती होती प्रत्येक गावात रोहिणी खडसे यांना मतदारांचा भरभरून प्रतिसाद लाभला महिलांनी औक्षण करून आणि ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात फुलांची उधळण करून रोहिणी खडसे आणि सहकाऱ्यांचे स्वागत केले

- Advertisement -

NCP Rohini Khadse

यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या
विद्यमान लोकप्रतिनिधींनी गेल्या निवडणुकीत विविध आश्वासने देऊन मतदान मागितले परंतु पाच वर्षे सत्ता पक्षात राहूनही दिलेली आश्वासनांची पुर्ती करण्यात ते अपयशी ठरले. गेले पाच वर्षात विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी, महिलांना सुरक्षित वातावरण,शेतीला पाणी, हाताला काम, शेतमालाला योग्य दाम मिळवुन देण्यासाठी हि निवडणूक लढवत असुन “तुतारी वाजवणारा माणुस” या चिन्हां समोरील बटण दाबुन सेवेची संधी देण्याची ग्रामस्थांना विनंती केली आ.एकनाथराव खडसे साहेबांच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकास कामे करण्यात आलेली असुन भविष्यात मतदारांनी टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत आ.एकनाथराव खडसे साहेब, रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, अरुण पाटिल, उदयसिंह पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याची रोहिणी खडसे यांनी ग्रामस्थांना ग्वाही दिली.

- Advertisement -

NCP Rohini Khadse

यावेळी बोदवड बाजार समितीचे उपसभापती ज्ञानेश्वर पाटिल यांनी मतदारांशी संवाद साधताना जनता जनार्धनाच्या भक्कम पाठिंब्याने आ.एकनाथराव खडसे यांनी तिस वर्ष मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना जाती पाती विरहित, सर्वसमावेशक राजकारण करत प्रत्येक लहान मोठ्या जात समुहाला स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थेच्या माध्यमातून नेतृत्वाची संधी
दिली.कोणतेही मतभेद अभिनवेश न बाळगता खेडोपाडी विकासाची गंगा पोहचवून मतदारसंघाचा सर्वांगिण विकास केला.पाठींब्याच्या आणि आशीर्वादाच्या पाठबळावर आ.एकनाथराव खडसे यांनी तिस वर्ष मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना जाती पाती विरहित, सर्वसमावेशक राजकारण करत प्रत्येक लहान मोठ्या जात समुहाला स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थेच्या माध्यमातून नेतृत्वाची संधी दिली.कोणतेही मतभेद अभिनवेश न बाळगता खेडोपाडी विकासाची गंगा पोहचवून मतदारसंघाचा सर्वांगिण विकास केला.परंतु गेल्या पाच वर्षात काही नतद्रष्ट लोकांकडून मतदारसंघाचा विकास न करता मतदारसंघात अराजकता निर्माण करण्याचे आणि जातीपातीत भांडणे लावण्याचे काम केले गेले हे सर्व थांबवुन सर्वांगिण सुंदर, शांत, विकसित मतदारसंघ घडवण्यासाठी

रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांनी मतदारांशी संवाद साधताना मनुर गाव परिसरातील हि गावे स्व. प्रल्हादभाऊ पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली सदैव राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या सोबत राहिले आहेत म्हणुन या गावांना राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेबांचा बालेकिल्ला म्हणुन ओळखले जाते आ.एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून परिसरात अनेक विकास कामे झालीत भविष्यात रोहिणीताई खडसे यांच्या माध्यमातून विकास कामे केली जातील विकास कामे करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. अपुर्ण सिंचन योजना पुर्ण करण्यासाठी आणि मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी तुतारी वाजवणारा माणुस या चिन्हां समोरील बटण दाबून रोहिणी ताई खडसे यांना मतदानरुपी आशिर्वाद देण्याची विनंती करून रोहिणी ताई खडसे यांना मताधिक्य देऊन तालुक्यात मनुर परिसराची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा बालेकिल्ला म्हणुन असलेली ओळख कायम ठेवा असे रविंद्र पाटिल यांनी ग्रामस्थांना आवाहन केले.

यावेळी कैलास चौधरी, रामदास पाटील,विरेंद्रसिंग पाटील,बाळुदादा पाटील,भारत पाटील,आबा पाटिल, विनोद मायकर, किरण भिसे,अमोल पाटील,ज्ञानेश्वर पाटील, गणेश पाटील , सम्राट पाटील,अनिल वराडे ,विलास देवकर, अनिल पाटील,भागवत टिकारे ,भरतअप्पा पाटील,विलास सिंग पाटिल,गणेश पाटिल,विजय चौधरी,शाम पाटील ,अजय पाटील,प्रदीप बडगुजर मयुर खेवलकर,निखिल पाटील,हकीम बागवान,जाफर शेख,लतिफ शेख ,मुजम्मील बागवान,
नईम खान, निलेश माळी, दीपक माळी,विनोद कोळी ,विजेंद्र पाटील राजेंद्र चौधरी,जीवन राणे, अमोल कोलते,प्रफुल पाटील,रवींद्र अटक राजुभाऊ परदेशी,कैलासभाऊ परदेशी,कालू मेंबर, भुरा मेंबर,नजीर सेठ,शामराव पाटील ,लक्ष्मण पाटिल, आशाताई टिकारे, प्रमोदभाऊ फरपट, भागवतभाऊ टिकारे,ज्ञानेश्वर माळी,दादाराव सोनन, विकास माळी, राहुल माळी,पंकज शेळके,अजय जंजाळ, ईश्वर बेटोते,अतुल माळी,वैभव माळी पवन माळी,विलास माळी,संजय गवारे, वैभव पाटील,वसंता पाटील प्रभाकर पाटील,विलास पाटील, प्रकाश फरपट,ऋषिकेश पारधी मयुर फरपट,अशोक माळी आणि ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, उपस्थित होते

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Rohit Pawar | रोहित पवारांचं आवाहन: ‘फक्त ठाकरे नव्हे,...

 Rohit Pawar साक्षीदार न्युज । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच चर्चा सुरू आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील संभाव्य युतीच्या संकेतांनी राजकीय वातावरण...

Income Tax Return | आयकर रिटर्नसाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक;...

Income Tax Return साक्षीदार न्युज । नवीन आर्थिक वर्ष 2024-25 ची सुरुवात झाली असून, आता नोकरदार आणि इतर करदाते गेल्या आर्थिक वर्षातील आयकर विवरणपत्र...

UttarPradesh Mother Elopes With Daughters Father In Law |...

UttarPradesh Mother Elopes With Daughters Father In Law साक्षीदार न्युज । एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४३ वर्षीय महिलेने आपल्या मुलीच्या ४६...

RECENT NEWS