Tribal Day celebrat | साक्षीदार न्यूज । ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात समान संधी केंद्र व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मा. प्राचार्य डॉ जे बी अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती दिवस व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपद उपप्राचार्य डॉ एस एन वैष्णव यांनी भूषविले तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ जे पी नेहेते यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सुरुवातीला प्रतिमा पूजन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. डॉ जे पी नेहेते यांनी यांनी आपल्या व्याख्यानात इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे 9 ऑगस्ट होय.
हा दिवस क्रांतीदिन म्हणून का साजरा केला जातो असे सांगितले. तसेच ९ ऑगस्ट हा दिवस जागतीक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस जगभरातील आदिवासी लोकांच्या हक्कांचे रक्षण आणि जागरूकता वाढवण्यासाठी तसेच त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस आदिवासी समुदायांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकतो आणि त्यांच्या सांस्कृतिक वारसा आणि योगदानाला महत्व देतो असे सांगितले तसेच डॉ एस एन वैष्णव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी मुंबई येथून भारत छोडो आंदोलन किंवा भारत सोडो आंदोलन सुरू केले. गांधीजींनी गोवालिया टँक मैदानावर भाषणात ” करा किंवा मरा ” हा नारा दिला, जो आता मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून ओळखला जातो असे सांगितले. तसेच आदिवासी दिवस साजरा करण्याची उद्दिष्टे सांगितली जसे आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण, जागरूकता वाढवणे, सांस्कृतिक वारसा जतन करणे, पर्यावरणाचे संरक्षण, समानता आणि न्याय. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा एस पी उमारीवड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा हेमंत बाविस्कर यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ पी आर महाजन, डॉ एस बी पाटील, डॉ एस ए, पाटील, डॉ जे पी नेहेते, प्रा एस आर इंगळे, डॉ एम के सोनवणे, प्रा अक्षय महाजन, डॉ पी आर गवळी, डॉ डी बी पाटील, प्रा एस बी महाजन, डॉ एस एस साळुंके, डॉ व्हि एन रामटेके, प्रा व्हि एच पाटील, डॉ एन यु बारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री हर्षल पाटील, श्री श्रेयस पाटील यांनी मेहनत घेतली.