राज्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ : ५ जणांना केली जबर मारहाण !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १० नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक जिल्ह्यात घरफोडी, दरोडेयासह चोरीच्या घटना सातत्याने वाढत असतांना आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील वैजापूर, कन्नड तालुक्यात बुधवारी मध्यरात्री दोन दरोडे पडले असून यात पहिला दरोडा वैजापूरच्या मनेगाव शिवारातील शेतवस्तीवर १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास पडला असून यात तिघा जणांना मारहाण करून ४५ हजारांचे दागिने हिसकावून मोर्चा कन्नड तालुक्यातील कानडगावकडे वळवला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कानडगाव येथील देविदास व संगीता नलावडे या दांपत्यालाही बेदम मारहाण केली व सोन्याचे दागिने, मोबाइल, लॅपटॉप असा एकूण २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. या दोन्ही घटनांमध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहे. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवले. गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत धरपकड सुरूच होती. गोळीबारात एक दरोडेखोर जखमी झाला. दरम्यान, शिऊर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. रात्री अडीच वाजेच्या दरम्यान शिऊर येथील पाण्याच्या टाकीजवळ पोलिसांनी दरोडेखोरांच्या छोटा हत्ती वाहनाला गाडी आडवी लावली व त्यात तपासणी केली असता प्लास्टिक कॅरेटच्या आड सात दरोडेखोर लपले होते. त्यापैकी दोघे जण बाहेर येऊन त्यांच्यावर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न केला. झटापट सुरू असताना लपलेले पाच जण चाकू व इतर शस्त्र घेऊन पोबारा केला. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या दोन दरोडेखोरांना रात्रीच पकडले. एसपी मनीष कलवानिया यांनी तीन पथके नेमली.

दरोडेखोरांच्या शोधात रात्रभर वैजापुर तालुक्यातील कोल्ही, जानेफळ, वडजी या परिसरात गस्त घालत होते. सकाळी शोध सुरू असताना पथकाला आरोपी हे जानेफळ शिवारात तलावाजवळील शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा लावला आणि ओरडून शरण येण्याचे आवाहन केले. मात्र यानंतर शेतात लपलेल्या दरोडेखोरांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. प्रत्युत्तरात पोलिसांनी सर्वप्रथम चार राऊंड व नंतर दोन राऊंड फायर केले. यात एक अमित कागद चव्हाण (२२, रा. हिंगणी, ता. कोपरगाव) हा जखमी झाला. या घटनेत पोलिस उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत, पोलिस अंमलदार वाल्मिक निकम आणि संजय घुगे हे दगडफेकीत जखमी झाले. या घटनेत शाम बडोद भोसले (२७), धीरज भारंब भोसले (१९), पांडुरंग भारंब भोसले (२६, तिघेही रा. पडेगाव, ता. कोपरगाव), परमेश्वर दिलीप काळे (२२, रा. थेरगाव, ता. कर्जत जि.नगर), अमित कागद चव्हाण यांच्या गुरुवारी सकाळी मुसक्या आवळण्यात आल्या. तर सागर रतन भोसले, (२०, पडेगाव ता. कोपरगाव), २) रावसाहेब भिमराव पगारे (३५, रा. पडेगाव कोपरगाव) यांना रात्रीच शिऊर पोलिसांना पकडले होते. अशा सात आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. आरोपींविरुद्ध एकूण शिऊर आणि देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS