Rohit Pawar साक्षीदार न्युज । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच चर्चा सुरू आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील संभाव्य युतीच्या संकेतांनी राजकीय वातावरण तापले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक सूचक ट्वीट करून सर्वच कुटुंबांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. या ट्वीटमुळे अजित पवार यांना अप्रत्यक्षरित्या सोबत येण्याची साद घातल्याचं बोललं जात आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात नवनव्या तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.
हालचालींची सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या वक्तव्यापासून झाली. त्यांच्या सूचक संकेतांनंतर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला, ज्यामुळे युतीच्या शक्यतेवर चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचं स्वागत करताना हा कौटुंबिक आणि राजकीय एकतेचा आनंददायी क्षण असल्याचं म्हटलं. त्यांनी ठाकरे कुटुंबाबरोबर पाच-सहा दशकांचे नाते असल्याचं सांगत बाळासाहेब ठाकरे यांना आठवण करून दिली आणि त्यांच्या अनुपस्थितीतही हा क्षण ऐतिहासिक असल्याचं मत व्यक्त केलं.
https://x.com/RRPSpeaks/status/1913568725598433421
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “मराठी अस्मितेला आव्हान देणाऱ्या शक्तींच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण आहे. फक्त ठाकरे कुटुंबच नव्हे, तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्राचा धर्म जपण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, ज्यामुळे राज्याच्या हिताचं रक्षण होईल.” हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं असून, यातून अजित पवार यांना शरद पवार गटात परतण्याचं सूचित केल्याचं मानलं जात आहे.
राज्याच्या राजकीय विश्लेषकांमते, ही एकप्रकारे पवार कुटुंबातील एकतेची पुन्हा स्थापना करण्याचा प्रयत्न असू शकतो. सध्या शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेद चर्चेत असले तरी रोहित पवार यांच्या या पवित्र्याने नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे. पुढील काळात यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मातेचे अनैतिक कृत्य: मुलीच्या सासऱ्यासोबत पळून गेली, कुटुंबाची नाचक्की
राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचे युतीचे संकेत: भांडणं मिटवली, पण …