साक्षीदार | १९ नोव्हेबर २०२३ | देशात आज वनडे भारत आणि ऑस्टेलिया संघामध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार असून ऑस्ट्रेलियाला नमवून विश्वचषक उंचावण्यासाठी रोहित सेना सज्ज झाली असून करोडो भारतीयांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याला पंतप्रधान मोदी हजेरी लावणार आहेत. यावरुनच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले कि, “पुर्वी मुंबई ही क्रिकेटची पंढरी होती. अशा प्रकारचे खेळांचे उत्सव मुंबई, दिल्ली किंवा ईडन गार्डनला व्हायचे. मात्र आता मुंबईतून संपूर्ण क्रिकेट हे अहमदाबादला हालवण्यात आलयं. कारण त्यांना राजकीय इव्हेंट करायचा आहे…” असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तसेच “आज जर आपण जिंकलो तर मोदी थे इसलिए हम जित गये. मोदी है तो वर्ल्डकपकी जीत मुमकीन है असं होणार, पाहत राहा असे संजय राऊत म्हणाले. पुर्वी खेळ हा खेळ होता, पण तो सुद्धा आता भाजपचा इव्हेंट झालायं. खेळालाही त्यांनी सोडले नाही..” अशी टीकाही राऊतांनी केली.