Rotary Club of Jalgaon Midtown ; जळगाव (sakshidar news) ; – मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जळगाव शहरात & जिल्ह्यात जनजागृती शासकीय यंत्रणेमार्फत मार्फ़त & विविध सेवाभावी संस्था मार्फत जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आहे. .
रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे मतदान जनजागृती व स्काऊट शिक्षण एक संस्कार या विषयावर गणपती नगर येथील रोटरी हॉल येथे व्याख्यान संपन्न झाले. व्यासपीठावर रोटरी अध्यक्ष श्री. आर. एन. कुलकर्णी, मानद सचिव श्री. अँड. किशोर पाटील, मदन रामनाथ लाठी (गांधी रिसर्च फाउंडेशन चे सहकारी आणि जळगाव जिल्हा लोकसभा २०२४ चे अधिकृत आयकॉन) उपस्थित होते.
जळगाव जिल्हा लोकसभा २०२४ चे अधिकृत आयकॉन यांनी थोडक्यात मतदानाचे महत्व सांगितले मतदानाची टक्केवारी वाढणेसाठी आपण सर्व १३ मे २०२४ रोजी सकाळी लवकर आपण & परिवाराती सदस्यांनी मतदान करून आपला हक्क बजवावा आणि त्यांचे बरोबर सर्वानी शपथ घेतली.
यावेळी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी गिरीश रमनलाल भावसार यांनी उपस्थितांना मतदान & म. जिल्हाधिकारीआयुष प्रसाद यांनी दिलेल्या लोकशाही उत्सवाच्या पत्राचे वाचन केले. यानंतर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आवाहन करून निवडणूक प्रक्रियेतील झालेले बदल, मतदार यादीत नाव शोधणे, SMS सुविधा समजावून सांगितले. यानंतर स्काऊट विभाग प्रमुख देवानंद पांढरे यांनी स्काऊट गाईड म्हणजे जीवन जगण्यासाठी उत्तम संस्काराचा नियोजनबद्ध आराखडा असून स्काऊट गाईड या आंतरराष्ट्रीय चळवळीचा इतिहास विषद केला. यावेळी स्काऊट प्रार्थना, रामधून झेंडागीत, नियम, वचन व ध्येय सांगून याविषयी माहिती सांगितली. स्काऊट राष्ट्रपती, राज्य पुरस्कार, पंतप्रधान ढाल स्पर्धा यावर प्रकाशझोत टाकला.
प्रारंभी रो. सुनंदा देशमुख यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊट हर्षल बडगुजर याचा देखील सत्कर करण्यात आला. कार्यक्रमास किशोर सूर्यवंशी, विवेक वडजीकर, अपर्णा मकासरे, दत्तात्रय चौधरी, चिरमाडे सर, उज्वला पाटील, आरती कुळकर्णी,योगेश चौधरी, दिनेश बडगुजर आदि उपस्थित होते. आभार विवेक वडजीकर यांनी मानले