साक्षीदार | २६ नोव्हेबर २०२३ | जामनेर तालुक्यातील डोहरी तांडा येथील नातेवाईक मालखेडा येथे जाताना गोंदेगावनजीक रिक्षाला अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात दहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डोहरी तांडा येथील तवंर परिवारातील नातेवाईक रिक्षाने मालखेडा येथे दशक्रिया विधीसाठी जात असताना रिक्षा गोंदेगाव नजीक उलटली. यात दहा जण होते. यात वयोवृद्ध आजींचा समावेश आहे. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य केले. जखमींना पहूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. नजमुद्दीन तडवी व अधिपरिचारक मुंडे यांनी प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी जखमींना जळगाव येथे हलविण्यात आले असून, जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.