धाराशिव जिल्हा कार्यकारनीत संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली निवड
साक्षीदार न्युज । पत्रकारिता अन् त्यासोबत सामाजिक भान राखून जनजागृतीपर उपक्रमाने पत्रकारिता क्षेत्रात मराठवाड्यात एक वेगळा ठसा उमटवीणारे उमरगा शहरातील पत्रकार सचिन बिद्री यांची डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या धाराशिव जिल्हा सचिव पदी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दि 19 रोजी तुळजापूरच्या शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकारांच्या बैठकीत निवडीचे पत्र देत सत्कार केले.
जिल्हा कार्यकरणीची निवड करताना उमरग्यातील पत्रकार श्री बिद्री यांची प्रामुख्याने दखल घेत,सोशल मीडियावर श्री बिद्री यांचे वाढते फॉलोव्हर्स आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून होणारी पत्रकारिता,समाज प्रबोधनापर शॉर्टफिल्म आदी बाबींची दखल घेण्यात आल्याचे संघटनेचे राज्य समन्वयक इकबाल शेख यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राजकीय विश्लेषक, जेष्ठ पत्रकार राजा माने यांच्यासह उपाध्यक्ष सतीश सावंत, सुभाष चिंदे, इकबाल शेख आदी मान्यवर आणि जिल्ह्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.








