Government
साक्षीदार | ८ ऑक्टोबर २०२३ | राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनांनाने राज्याचे राजकारण तापविले होते त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे राज्य दौऱ्यावर असतांना त्यांनी नुकतेच शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेतले आहे.
यावेळी साईबाबांच्या Sai Baba शिकवणुकीप्रमाणे आम्ही सबुरी ठेवली आहे. सबुरी आहे म्हणूनच मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन सुरु आहे. परंतु ठरलेल्या मुदतीत सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल अशी अपेक्षा असून सरकारला सद्बुद्धी द्या; असे साकडं मनोज जरांगे पाटील यांनि साईबाबांना घातले आहे. सध्या ते अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेतले. अहमदनगर जिल्ह्यातील लोकांनी दौऱ्याला मोठा प्रतिसाद दिला असल्याचे म्हणत सरकारने मराठा समाजाच्या वेदना समजून घ्याव्यात; अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आपल्यात जातीय तेढ निर्माण व्हायला नको. आम्ही कधी तुमच्याविषयी भेदभाव ठेवला नाही. आमच्या बापजाद्यांनी तुम्हाला साथ दिली. आता तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करू नका. मराठा आरक्षणाच्या विरोधात कुणी बोललं तर मी सहन करत नाही. ओबीसी नेते मराठा आरक्षणाच्या बाबतीत का रोष घेताय? तुम्हाला मोठं करण्यात मराठा समाजाचे योगदान असून त्या उपकारांची परतफेड करा असे म्हणत ओबीसी नेत्यांबद्दल मराठा समाजात नाराजी असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.