Mahatma Phule Jayanti | साकळीत फुलेंच्या विचारांचा महाजागर! ११ एप्रिलला ‘मी ज्योतिराव फुले बोलतोय!’ विशेष कार्यक्रम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mahatma Phule Jayanti साकळी | मिलिंद जंजाळे | क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त साकळी येथे विचारप्रबोधनाचा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता महात्मा ज्योतिबा फुले चौक येथे भव्य जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून, ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

- Advertisement -

महात्मा फुले यांनी दिलेल्या सामाजिक समता, शिक्षणाचा प्रसार आणि स्त्री-पुरुष समानतेच्या विचारांचा प्रसार समाजात अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून समाजातील सर्व घटकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून मान्यवर वक्ते राजेंद्र माळी (वाघळीकर) यांचा “मी ज्योतिराव फुले बोलतोय!” हा प्रभावी एकपात्री प्रयोग सादर होणार आहे. या प्रयोगातून महात्मा फुले यांच्या संघर्षमय जीवनाचा आणि समाज परिवर्तनातील योगदानाचा जिवंत आढावा मांडला जाणार आहे.

- Advertisement -

या कार्यक्रमास विद्यार्थी, युवक, महिला आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त माळी समाज साकळी प्रेरित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.

साकळीतील हा उपक्रम केवळ जयंती उत्सवापुरता मर्यादित न राहता सामाजिक जागृती आणि समतेच्या मूल्यांचा प्रसार करणारा एक प्रेरणादायी सोहळा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

Mahatma Phule Jayanti

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Molecular Lab Jalgaon | धक्कादायक: जळगाव जिल्हा रुग्णालयातील ‘माॅलेक्युलर...

Molecular Lab Jalgaon देयके पूर्ण; तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांसह बड्या अधिकाऱ्यांवर संगनमताने भ्रष्टाचाराचा आरोप Molecular Lab Jalgaon साक्षीदार न्युज  | सुनिल भोळे | जळगाव जिल्हा सामान्य...

LPG Price | एलपीजी दरवाढीने रिक्षाचालक आक्रमक! ८ एप्रिलला...

LPG Price | जळगाव | एलपीजी इंधनाच्या वाढत्या दरांमुळे आणि अपुऱ्या पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या ऑटोरिक्षा चालकांनी ८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलनाचा इशारा...

Shiv Sena Event | साकळीत शिवसेनेचा मेगा शक्तीप्रदर्शन! ४००...

Shiv Sena Event यावल | मिलिंद जंजाळे | साकळी येथे शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा जंगी कार्यकर्ता प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. भवानी माता मंगल...

RECENT NEWS