Sakli Road Development | साकळीकरांच्या आंदोलनाला अखेर यश! साकळी फाट्यापासून गावापर्यंत काँक्रीट रस्ता; गटारींचे कामही सुरू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Sakli Road Development | मिलिंद  जंजाळे | साकळी फाट्यापासून साकळी गावापर्यंतचा अनेक वर्षे खड्डेमय आणि धुळीने भरलेला रस्ता अखेर दुरुस्तीच्या मार्गावर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते मिलिंद साहेबराव जंजाळे यांच्या नेतृत्वाखाली २ जुलै २०२१ रोजी झालेल्या आंदोलनानंतर या प्रश्नाला गती मिळाली होती. त्यानंतर सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आता या मार्गाचे थेट काँक्रीटीकरण सुरू झाले असून दोन्ही बाजूंनी पक्क्या गटारींचे कामही वेगाने सुरू आहे.

- Advertisement -
आंदोलनानंतर प्रशासन हलले

साकळी फाट्यापासून गावापर्यंतचा रस्ता वर्षानुवर्षे अत्यंत खराब अवस्थेत होता. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धुळीचे ढग आणि सतत अपघातांचा धोका यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. अखेर ग्रामस्थांनी एकजुटीने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

या आंदोलनानंतर सामाजिक कार्यकर्ते मिलिंद साहेबराव जंजाळे यांनी संबंधित प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. विविध निवेदने देत या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्यात आला. संबंधित अभियंता तडवी यांनीही प्रस्ताव पुढे पाठवत प्रक्रिया गतीमान केल्याची माहिती मिळते.

- Advertisement -
आमदार निधीतून मंजुरी

यावल-चोपडा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी या प्रश्नात लक्ष घालत आमदार निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. निधी मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला वेग मिळाला आणि आता रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू झाले आहे.

कायमस्वरूपी उपाय

या मार्गाचे काँक्रीटीकरण केल्यामुळे पावसाळ्यातील चिखल व पाण्याची समस्या कमी होणार आहे. दोन्ही बाजूंनी बांधण्यात येणाऱ्या पक्क्या गटारींमुळे पाण्याचा निचरा सुरळीत होईल. परिणामी ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी, महिला तसेच व्यापारी यांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याचे आवाहन

कामाला सुरुवात झाली असली तरी त्याचा दर्जा कायम राहणे महत्त्वाचे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद साहेबराव जंजाळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी ग्रामस्थांना आवाहन करत सांगितले की शासनाने मोठा निधी उपलब्ध करून दिला असून काम दर्जेदार झाले पाहिजे. ठेकेदार आणि अभियंत्यांवर पूर्णपणे अवलंबून न राहता ग्रामस्थांनीही कामावर लक्ष ठेवावे.

साकळी विकासाच्या दिशेने

साकळीकरांच्या एकजुटीमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. काँक्रीट रस्त्यामुळे साकळी गावाच्या विकासाला नवे बळ मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. यासाठी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद साहेबराव जंजाळे आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

मध्य-पूर्वेत महायुद्धाची ठिणगी! खामेनींच्या मृत्यूनंतर इराणचा UAEवर हल्ला; भारतावर आर्थिक संकटाचे सावट?
इन्स्टाग्रामवरील प्रेम ठरलं जीवघेणं; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या, चोपडा तालुका हादरला
तलाठी कार्यालयात आमने-सामने! शाब्दिक वादाचा व्हिडिओ रेकॉर्ड, प्रकरण पोलीस ठाण्यात
“लाच प्रकरणानंतर 24 तासातच जळगावात वाळू माफियांचा कहर! 57 वर्षीय नागरिकाचा डंपरखाली

Sakli Road Development

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Devabhau Foundation | रिक्षाचालकांचा आवाज आता ‘देवाभाऊ फाउंडेशन’मध्ये घुमणार;...

Devabhau Foundation | साक्षीदार न्यूज | जळगाव सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे कोळी समाजाचे नेते आणि रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांच्या...

Ramajan 2026 | कडक ऊन अन् अभ्यासाचा ताण; तरीही...

Ramajan 2026  | यावल |मिलिंद जंजाळे | धार्मिक आस्था, संयम आणि शिस्तीचे दर्शन घडवत यावल शहरातील एका ११ वर्षीय चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे....

Share Market Crash | महायुद्धाच्या सावटाखाली जागतिक बाजारपेठा; सेन्सेक्स...

 Share Market Crash |साक्षीदार न्यूज | मध्यपूर्वेतील इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला युद्धाची झळ बसली आहे. या त्रिकोणी संघर्षाचा भडका उडाल्याने...

RECENT NEWS