साक्षीदार | २६ नोव्हेबर २०२३ | देशभरातील अनेक तरुण उच्च शिक्षण झालेले असतांना नोकरी मिळत नाही पण सध्या एक मोठी संधी नोकरीची मिळाली आहे. ओडिशा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (OFDC) कडून लेखा सहाय्यक ग्रेड II, सहाय्यक ग्रेड III, कार्यकारी सहाय्यक, क्षेत्र सहाय्यक ग्रेड II आणि क्षेत्र सहाय्यक ग्रेड III. या पदांच्या भरतीसाठी नोंदणीची प्रक्रिया 22 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाली आहे.
इच्छुक उमेदवार www.odishafdc.com या अधिकृत वेबसाइटला (Website) भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 12 डिसेंबर 2023 ही निश्चित करण्यात आली आहे.
या भरतीमध्ये सहभागी होण्यास पात्र असलेले सर्व उमेदवार तात्काळ अधिकृत वेबसाइट www.odishafdc.com ला भेट देऊ शकतात आणि ऑनलाइन (Online) अर्ज भरू शकतात.
ओडिशा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नियमितपणे 355 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांचे तपशील पाहूयात –
लेखा सहाय्यक (ग्रेड-II): 09 पदे
सहाय्यक (ग्रेड-III): 61 पदे
कार्यकारी सहाय्यक: 13 पदे
फील्ड असिस्टंट (ग्रेड-II): 47 पदे
फील्ड असिस्टंट (ग्रेड-III): 225 पदे
अनारक्षित आणि SEBC उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर SC, ST आणि PWD प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. उमेदवार 12वी उत्तीर्ण असावा. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयात पदवीधर पदवी देखील असणे आवश्यक आहे. पदांवर निवडलेल्या उमेदवारांना पदानुसार 17,200 रुपये ते 35,400 रुपये मासिक वेतन दिले जाईल.