साक्षीदार | २९ नोव्हेबर २०२३ | बेंगळुरूमध्ये नवजात बालकांच्या तस्करीमध्ये गुंतलेल्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत सात ‘एजंट’ना अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये डॉक्टरांचाही सहभाग असल्याचा संशय आहे. बेंगळुरूचे पोलिस आयुक्त बी दयानंद यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
येथील राजराजेश्वरी नगर येथे टोळीतील काही जण संशयास्पद फिरताना आढळल्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून २० दिवसांच्या बाळाची सुटका करण्यात आली. ही टोळी शेजारील तामिळनाडूतील असल्याचे त्यांनी सांगितले. सुहासिनी, गोमथी, कन्नन रामास्वामी, हेमलता, शरण्या, महालक्ष्मी आणि राधा, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही एक मोठी टोळी आहे ज्यात मुलांची तस्करी केली जाते. यात मुले नसलेल्या पालकांना ८ लाख ते १० लाख रुपयांना नवजात बालके विकले जातात. आतापर्यंत १० मुलांची त्यांनी विक्री केल्याचे समोर आले असल्याचे त्यांनी सांगितले.