Salman Khan House Firing News: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चार राऊंड गोळीबार करण्यात आला आहे. पहाटे 4.50 च्या सुमारास दोन अज्ञातांनी हा हवाई गोळीबार केला. दोन्ही शूटर दुचाकीवरून आले आणि चार राऊंड गोळीबार करून तेथून पळ काढला. सध्या तरी कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. पोलिसांकडून सलमान खानच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे.
जरूर बघा ; बापा पुढे बापाच्या जागी असलेला सासरा जिंकला…
Salman Khan House Firing News
या गोळीबारानंतर मुंबई गुन्हे शाखेसह वांद्रे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. याशिवाय फॉरेन्सिक टीमही तपासासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. पोलिसांनी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. डीसीपीही घटनास्थळी पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला अनेकवेळा जीवे मारण्याची धमकी देखील दिलेली आहे. अलीकडेच लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता-गायक गिप्पी ग्रेवाल यांच्या कॅनडातील निवासस्थानावरही हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर त्याचे सलमान खानशी जवळचे संबंध असल्याचे बोलले जात होते, त्यामुळे हा हल्ला करण्यात आला.
यापूर्वीही धमकी मिळाली होती
2023 मध्ये देखील लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमानच्या ऑफिसला धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता (Salman Khan House Firing News). लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा वाढवली होती. सध्या सलमानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. वास्तविक, मोहित गर्गच्या आयडीवरून सलमान खानच्या ऑफिसला पाठवलेल्या ईमेलमध्ये असे म्हटले होते की, ‘गोल्डी भाई (गोल्डी ब्रार) यांना तुमच्या बॉस सलमान खानशी बोलण्याची गरज आहे. लॉरेन्स बिश्नोई यांची मुलाखत जर का तुम्ही बघितली नसेल (Salman Khan House Firing News) तर बघायला सांगा.
‘जर तुम्हाला प्रकरण बंद करायचे असेल तर प्रकरण पूर्ण करा. समोरासमोर बोलायचे असेल तर मला कळवा. आता आम्ही वेळीच माहिती दिली आहे, पुढच्या वेळी फक्त धक्काच दिसेल. यानंतर, सलमान खानचे व्यवस्थापक प्रशांत गुंजाळकर यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुंड गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्याविरुद्ध कलम १२० (बी), ३४ आणि ५०६ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. (Salman Khan House Firing News)








