Sambhaji Maharaj Statue | “जळगावात मोठी मागणी! स्वामी समर्थ चौकात छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी”

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sambhaji Maharaj Statue जळगाव | साक्षीदार न्यूज | रामेश्वर कॉलनी विकास फाऊंडेशन, मेहरूण यांच्या वतीने स्वामी समर्थ चौकात छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली असून यासाठी महापौर दीपमाला काळे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

- Advertisement -

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, रामेश्वर कॉलनीतील अशोक किराणा ते जकात सोसायटी तसेच श्रीकृष्ण मेडिकल ते मंगलपुरी या मार्गांच्या मध्यभागी असलेल्या स्वामी समर्थ चौकात पुतळा उभारण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे. या परिसरात विविध जाती-धर्माचे नागरिक एकत्र राहत असून छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असे नागरिकांनी निवेदनात म्हटले आहे.

छत्रपती संभाजी राजे यांच्या शौर्य, त्याग आणि महिलांबाबतच्या उच्च विचारसरणीमुळे ते प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरतात. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारा पुतळा समाजाला सकारात्मक दिशा देईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. तसेच प्रस्तावित पुतळ्यामुळे वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नसून “सुंदर जळगाव” या संकल्पनेलाही चालना मिळेल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

नागरिकांनी या संदर्भात तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत – स्वामी समर्थ चौकात पुतळा उभारणीसाठी महासभेत ठराव मंजूर करणे, चौकातील जागा उपलब्ध करून देणे आणि आवश्यक निधी मंजूर करणे. यावेळी परिसरातील नगरसेवक गणेश सोनवणे उपस्थित होते. या निवेदनावर संदीप मांडोळे, संजय सपकाळ, ज्ञानेश्वर पाटील, महेश माळी, नंदू पुराणिक, संजय जगताप, विशाल पाटील, दीपक मांडोळे, सचिन वाघ, ॲड. ललित तेली, हर्षल वाणी, विजय पाटील यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, या मागणीवर प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेतला जातो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sambhaji Maharaj Statue

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

MSP Scheme | “शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन...

MSP Scheme जळगाव | साक्षीदार न्यूज | किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२५–२६ साठी जिल्ह्यात भरडधान्य खरेदी प्रक्रियेला गती देण्यात आली...

MIDC Police Bike Theft Case | “12 तासांत पोलिसांचा...

MIDC Police Bike Theft Case जळगाव | साक्षीदार न्यूज | मोटरसायकल चोरीच्या प्रकरणात एम.आय.डी.सी. पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपीला अटक करत चोरीची गाडी जप्त...

BJP Foundation Day Bhusawal | “४६ वर्षांचा प्रवास, कार्यकर्त्यांना...

BJP Foundation Day Bhusawal भुसावळ | साक्षीदार न्यूज | भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेला ४६ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भुसावळ शहर उत्तर मंडळाच्या वतीने सोमवारी (दि....

RECENT NEWS