Sand Mafia ; वाळू माफियांवर मोठी कारवाई – १० जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Sand Mafia ; साक्षीदार न्यूज ; – दोन वर्ष झाले सर्वदूर वाळू बंद आहे, मात्र चोरीची वाळू सुरु आहे महसूल प्रशासनाच्या आशीर्वाद असल्या शिवाय हि वाहतूक होणे शक्य नाही . अनेक वेळा वाळू माफियांनी महसूल प्रशासनाच्या अधिकार्यांवर जीवघेणा प्रकार देखील केलेला आहे . तरी देखील वाळू चोरी हि बंद झालेली नाही. असाच एक प्रकार भडगाव तालुक्यातील गिरणा नदी पात्रात अवैध्य प्रद्धतीने वाळू चोरी होत असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने व भडगाव पोलिसांच्या पथकाला मिळाल्यावर सकाळी पाच वाजेच्या सुमारास नदीपात्रात कारवाई केली घडली आहे . या ठिकाणी गेल्या अनेक दिवासांपासून वाळू चोरी मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे बोललेलं जात आहे . या कारवाईत ५ डंपर, ५ स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर, २ जेसीबी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी १० जणांविरोधा भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिति अशी कि , भडगाव तालुक्यातील गिरणा नदी पात्रात रात्रीच्या वेळी काही जेसीबीच्या सहाय्याने वाळूचे उत्खनन सुरु असल्याची माहिती मिळालयावर पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने व भडगाव पोलिसांच्या पथकाने नदीपात्रात धाड़ टाकली असता याप्रकरणी संदीप मुरलीधर पाटील वय ४१ रा. वडगाव सतीचे ता. भडगाव, अक्षय देवीदास मालचे वय २० , प्रविण विजय मोरे वय २०, मच्छिंद्र गिरधर ठाकरे वय २१, ललीत रामा जाधव वय २२, शुभम सुनिल भील वय २१, रणजीत भास्कर पाटील, रवि पंचर, गणेश मराठे आणि भोला गंजे सर्व रा. भडगाव यांच्या विरोधात पोकॉ. राहूल महाजन यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणत आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्ष डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्ष कविता नेरकर-पवार, सहाय्यक पोलीस अधिक्ष अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तुषार देवरे, पोना. राजेंद्र निकम, पोहेकॉ भगवान पाटील , विकास पाटील, विश्वास देवरे, महेश बागुल, चेतन राजपूत, सुनिल मोरे, श्रीराम कांगणे, समाधान पाटील, राहूल महाजन, पोकॉ सुदर्शन घुले यांनी केली. या घटनेमुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Sand Mafia

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS