साक्षीदार | २७ ऑक्टोबर २०२३ | गिरणा नदीपात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा करणाऱ्या ट्रॅक्टवर तालुका पोलिसांच्या पथकाने बुधवारी दुपारच्या सुमारास कारवाई केली. कारवाई होत असल्याचे समजताच चालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील निमखेडी शिवारातील गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा होत असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलीसांच्या पथकाने बुधवारी दुपारी १ वाजता धडक करवाई केली. यात विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये वाळू भरतांना काहीजण दिसून आले. दरम्यान पोलीसांना पाहून अज्ञात ट्रॅक्टर चालक पसार झाला. पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी पो.कॉ. महेश शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे करीत आहे.