Sangli Crime | वाढदिवसाच्या स्टेजजवळच राजकीय नेत्याची ‘मुळशी पॅटर्न’ स्टाईलने हत्या; शुभेच्छा दिल्या आणि…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Sangli Crime | सांगली | सांगली शहर मध्यरात्रीच्या सुमारास एका थरारक खुनाच्या घटनेने हादरून गेले आहे. उत्तम जिनाप्पा मोहिते (वय ४१, रा. गारपीर चौक, सांगली) या राजकीय पदाधिकाऱ्याची त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी, स्टेजजवळच धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली.

- Advertisement -

‘मुळशी पॅटर्न’ (Mulshi Pattern) स्टाईलने झालेली ही खुनाची घटना मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली.

नेमकं काय घडलं?

मृत उत्तम मोहिते हे दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष होते. सांगली जिल्ह्यात विविध विषयांवर हटके आंदोलन करण्यामुळे ते परिचित होते. मंगळवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गारपीर चौक येथील त्यांच्या घरासमोर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

रात्री दहा वाजण्याच्या सुमारास, संशयित आरोपी शाहरुख शेख हा त्याच्या काही साथीदारांसह या ठिकाणी आला. त्याने कार्यक्रमात जेवणही केले. यानंतर, शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने हे टोळके उत्तम मोहिते यांच्याजवळ गेले.

अचानक, त्यांच्याजवळील धारदार हत्याराने त्यांनी उत्तम मोहिते यांच्या पोटात आणि मानेवर गंभीर वार केले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ आणि पळापळ सुरू झाली.

जमावाचा संशयित आरोपीला चोप

हल्ला झाल्यानंतर संशयित आरोपी आणि मोहिते यांच्या समर्थकांमध्ये मोठी झटापट (धुमश्चक्री) झाली. गंभीर जखमी अवस्थेत उत्तम मोहिते यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, उत्तम मोहिते यांच्या समर्थकांच्या संतप्त जमावाने संशयित आरोपी शाहरुख शेख याला बेदम चोप दिला. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे सांगली शहरात मोठी खळबळ उडाली असून, परिसरात तणावाचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी तसेच रुग्णालयाच्या परिसरात दाखल झाला होता. खबरदारी म्हणून या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, मध्यरात्रीपर्यंत शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Govinda Health | बॉलिवूड अभिनेता गोविंदाची प्रकृती अचानक बिघडली, मध्यरात्री रुग्णालयात दाखल!
Arun Bhai Gujarati | शरद पवारांना मोठा धक्का! ४० वर्षांची साथ सोडत जिवलग सहकारी अरुण गुजराती अजित पवारांच्या राष्ट्रवादीत; कार्यकर्त्यांसाठी घेतला निर्णय
Unmesh Patil | ब्रेकिंग: ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह तिघांवर ₹५.३३ कोटींची फसवणूक; गिरीश महाजनांच्या आरोपानंतर तीनच दिवसांत गुन्हा दाखल
Local Government Elections | “भाजप आमचा एक नंबरचा शत्रू; रोखण्यासाठी शिंदे-अजित पवार गटाशीही युतीची तयारी”

 

Sangli Crime

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS