साक्षीदार | २० ऑक्टोबर २०२३
गेल्या काही दिवसापासून ड्रग्स प्रकरणी आरोपी ललित पाटील याला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर आता नाशिकमध्ये सुरु असलेल्या ड्रग्सच्या काळ्या धंद्यांविरोधात ठाकरे गटाने विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चावर शिवसेना शिंदे गटाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी सडकून टीका केली आहे.
संजय राऊत मनोरुग्ण झाले आहेत? किंवा सकाळी उठून तेच ड्रग्स घेतात की अशी शंका आता महाराष्ट्रातील जनतेला येत आहे. रोज सकाळी उठून बेछूट आरोप करायचे. संजय राऊत यांचे सगळे आरोप नाशिकमधील ड्रग्सचा कारखाना उघडकीस आल्यानंतरचे आहेत. ललित पाटील हा शिवसेनेचा कार्यकर्ता होता. त्याचे फोटो देखील समोर आले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा किती ड्रग्स तस्करांवर कारवाई झाली, असा सवालही देवयानी फरांदे यांनी केला आहे.
ललित पाटीलकडून मातोश्रीवर किंवा संजय राऊतांन हप्ते जात होते का? याची चौकशी गृहखात्याने करावी. ललित पाटील पकडला गेल्याने संजय राऊत यांचे नुकसान झालं म्हणून त्यांची तडफड झाली आहे. संजय राऊत यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणीही देवयानी फरांदे यांनी केली आहे.