७ वर्षानंतर साकार होणार पिंपळगांव कमानी येथील संत सेवालाल महाराज मंदिराचा भव्य दिव्य समाजमंदिर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

६’मार्च रोजी मा.ना.गिरीषभाऊ महाजन आणि अनेक मान्यवरांच्या हस्ते भव्य भुमीपूजन सोहळा
गावातील दानशूर-मा.मल्लू चव्हाण,अजय चव्हाण,रविंद्र चव्हाण यांनी दिली ३ गुंठा जागा

- Advertisement -

साक्षीदार न्युज (अशोकराव चव्हाण) ; – पहूर येथून जवळच असलेल्या पिंपळगांव कमानी येथील बंजारा समाजाचे आराध्य दैवत-संत सेवालाल महाराज व देवी जगदंबा माता मंदिराच्या सभामंडप (समाजमंदिर) बांधून मिळावे या मागणीसाठी गेल्या ७ वर्षापासून जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण आणि सर्व संचालक मंडळ तथा तत्कालीन सरपंच-सौ.कविता अर्जून राठोड,मा.ग्रा.पं.सदस्य-प्रल्हादभाऊ चव्हाण,यांनी राज्याचे तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा विद्यमान ग्रामविकास तथा पर्यटन व वैद्यकीय शिक्षणमंत्री-मा.ना.गिरीषभाऊ महाजन यांच्याकडे संत सेवालाल महाराज जयंतीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात मागणी केली होती.

या मागणी चा सतत गेली ७ वर्षे पाठपुरावा करीत आल्याने मा.ना.गिरीषभाऊ महाजन यांनी यावर्षी या सभामंडप च्या सभागृह साठी मंजुरी दिली आहे.आणि या सभामंडप बांधकाम चे भुमीपूजन येत्या ६’मार्च २०२४,बुधवार रोजी सकाळी-१०ः०० वाजता संत सेवालाल महाराज,आई जगदंबा देवीच्या मंदिरावर भव्य असा भुमीपूजन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत प्रशासन तर्फे करण्यात आला आहे. विशेष असे की,या भव्य अशा सभामंडपला लागणारी जागा ही गावातील दानशू-मा.मल्लू गबरु चव्हाण,मा.अजय गबरु चव्हाण आणि मा.रविंद्र गबरु चव्हाण या तिन्ही भावानी सहज उपलब्ध करुन दिली आहे.

- Advertisement -

या भव्य अशा सभामंडप तथा समाजंदिर चा भुमीपूजन सोहळा तालुक्याचे लोकप्रिय व लाडके आमदार तथा राज्याचे ग्रामविकास व पर्यटन आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री-ना.गिरीषभाऊ महाजन,नगरपरीषद च्या लोकनियुक्त नगराध्यक्षा-मा.सौ.साधनाताई गिरीषभाऊ महाजन,भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा-मा.डॉ.केतकीताई पाटील,भाजपा नेते-मा.संजयदादा गरुड,भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष-मा.निलेशभाऊ चव्हाणसर,तालुकाध्यक्ष-समाधान बाविस्कर,पोलिस पाटील-इंदलभाऊ चव्हाण,नायक-भोजराज राठोड,तुकडू नाईक,रामदेवजी बाबा मंदिर,पुजारी-मा.मदन महाराज,माजी सरपंच तथा ज्येष्ठ नागरिक-मा.शेषमलजी राठोड,मा.रतनजी चव्हाण तथा सर्व आजी-माजी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी यांच्या शुभहस्ते भव्य असे समाजमंदिर सभागृह भुमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी,पिंपळगांव कमानी येथील सर्व समाजबांधव तसेच परिसरातील समाजबांधव यांनी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती द्यावी असे आवाहन ग्रामपंचायतच्या सरपंच-सौ.प्रियंकाताई ताई चव्हाण,उपसरपंच-संदिपभाऊ राठोड,ग्रा.पं.सदस्या-मा.सौ.सईबाई चव्हाण,मा.सौ.अनुसया चव्हाण,मा.सौ.तारावंती राठोड,मा.कैलासभाऊ चव्हाण,चेतनभाऊ चव्हाण,यांनी केले आहे.

Sant Sevalal Maharaj

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS