Nashik Saptshringi Fort Accident | देवी दर्शनावरून परतणाऱ्यांवर काळाचा घाला! ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Nashik Saptshringi Fort Accident | नाशिक | जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाने अचानक झडप घातली. देवीचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात असताना सप्तशृंगी गडाजवळील गणपती पॉइंट परिसरात एक इनोव्हा कार सुमारे १००० ते १२०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

अपघातग्रस्त कारचा क्रमांक एमएच १५ बीएन ०५५५ असा असून, वाहनात एकूण सात प्रवासी होते. मृतांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, दरीची प्रचंड खोली, घनदाट जंगल आणि दुर्गम भागामुळे मदतकार्यात मोठ्या अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

अपघात कसा घडला?

प्राथमिक माहितीनुसार, भाविक देवीचे दर्शन घेऊन घरी परतत होते. दुपारच्या सुमारास गणपती पॉइंटजवळ वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी, कारने रस्त्यावरील संरक्षक कठडा तोडला आणि थेट दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की अनेकांनी जागीच प्राण गमावले. सध्या दरीत अडकलेले मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मृतांची ओळख पटवण्याचे कामही सुरू आहे.

- Advertisement -

बांधकाम विभागावर ग्रामस्थांचा संताप

या भीषण दुर्घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घाट रस्त्यावरील काही भागात संरक्षक भिंतींचे काम अद्याप अपूर्ण असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आवश्यक त्या ठिकाणी कठडे, सुरक्षा भिंती आणि सूचना फलक नसल्यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण सप्तशृंगीगड परिसरात शोककळा पसरली असून, भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Nashik Saptshringi Fort Accident

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS