Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कठीण प्रसंगी रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, तसेच समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत अधिकाधिक लोकांनी रक्तदान करावे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता.
या शिबिराची सुरुवात स्वतः सारिका ताई राजपूत यांनी रक्तदान करून केली, ज्यामुळे उपस्थितांना सामाजिक संदेश देण्यात आला.
या प्रसंगी प्रभागातील नगरसेविका सौ. सोनल ताई महाजन, सौ. छायाताई देशमुख तसेच स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर ऋषालीताई चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी दामोदर राजुपत, संदीप राणा, प्रवीणसिंग पाटील, मीनाताई राजपूत, प्रमिला राजपूत, कविता राजपूत, संगीता राजपूत, सविता राजपूत, नीलिमा ताई राजपूत, संजना राजपूत, रुपाली सूर्यवंशी, आशालता राजपूत, राजू राजपूत, गणेश राजपूत, हिरासिंग राजपूत, प्रवीण बाऱ्हे, मनोज कोळी, गोपाल महाजन, संदीप बोलणकर, प्रदीप ठाकूर, गोपाळ सुरळकर, माला चौधरी, प्रतीक्षा राजपूत, वर्षा राजपूत, प्रियंका राजपूत, निशा चौधरी, संध्या चंदेल, वैशाली सावकारे, सविता घुले, मोहिनी बेंडाळे, स्वाती भिरूड, श्रद्धा राजपूत, मंगला राजपूत, सोनाली राजपूत, शारदा राजपूत, माधुरी कोळी, गौरीताई, मोरे मॅडम, मनीषा किरंगे आदी समाज बांधव व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरातून समाजात सकारात्मक संदेश देत, सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करण्यात आली.








