माजी गुलाबराव देवकरांच्या नेतृत्वावर दाखविला विश्वास
जळगाव (सुनिल भोळे) : – महाविकास आघाडीचे जळगाव ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रामदेववाडीचे सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी असंख्य तरूणांसह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केला. स्वतः श्री.देवकर यांनी सर्वांचे पक्षाच्या वतीने मनःपूर्वक स्वागत केले.
विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे हात बळकट करण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची दिवसेंदिवस वाढतच आहे. रामदेववाडीचे सरपंच भगवान भीका चव्हाण, उपसरपंच उखा भीमा राठोड, ग्रा.पं.सदस्य उदल चव्हाण, राजेश राठोड, समाजसेवक राजेश चव्हाण यांनीही शेकडो तरूणांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, शिरसोलीचे माजी सरपंच प्रदीप (बापू) पाटील व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘यांनी’ केला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत प्रवेश
सुरेश राठोड, सुनील चव्हाण, दिनेश राठोड, प्रेम राठोड, नदू जाधव, पोपट चव्हाण, अंकुश चव्हाण, शंकर राठोड, समाधान राठोड, अर्जून चव्हाण, शालीक पवार, भाईदास राठोड, नवल राठोड, प्रवीण जाधव, मोहन जाधव, नवल चव्हाण, रसाल चव्हाण, जोतमल राठोड, रवींद्र राठोड, धमा जाधव, रोशन राठोड, अरूण राठोड, दीपक राठोड, जयवंत राठोड, विकास सुभाष राठोड, दिलीप राठोड, येग्यश राठोड, भगत राठोड, भानुदास राठोड, विकास जयराम राठोड, किशोर चव्हाण, विनोद राठोड, समाधान जाधव, अशोक राठोड, गणेश राठोड, विनोद राठोड, नदू राठोड, विजय राठोड