सावदा ;- इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असलेला सावदा येथील ख्वाजानगर परिसरातील शे. ताबिश शे. रमजान मोमीन हा १५ वर्षाच्या मुलाचे ईद च्या दिवशी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गारबर्डी धरणात घडली .
- Advertisement -
सविस्तर वृत्त असे की शेख ताबिश शेख रमजान मोमीन हा मुलगा आपल्या चार ते पाच मित्रांसोबत सकाळच्या ईदगाह वरील सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर गारबर्डी धरणावर फिरायला गेला असता पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून त्याचे दुःखद निधन झाले. हा परिवारातील दोन नंबर चा मुलगा होता. याच्या पश्चात एक मोठा आणि एक लहान भाऊ आहेत. ऐन ईद च्या दिवशी घरातील एक जवान मुलगा गेल्याने त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
- Advertisement -