यावल ( प्रतिनिधी ) ; – हक्कासाठी लागणाऱ्या लढताना कर्तव्याची जाणीव ठेवून कर्तुत्व गाजवणाऱ्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कोरपावली ग्राम पंचायत मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून मान वंदन देण्यात आली,
याप्रसंगी सरपंच विलास अडकमोल यांनी सावित्रीबाई फुले यांचे जिवनातील संघर्ष व त्यांनी महिला शिक्षणासाठी केलेले योगदान व त्याचे महत्व समजून सांगितले,मात्र अलीकडेच्या काळात महीला स्वातंत्र संदर्भात समाजाचा स्वैराचार बदलताना दिसत आहे,हा त्या माऊली चा अपमान नव्हे काय असा प्रश्न उपस्थित केले महिलांना स्वातंत्र्य मिळावे म्हणून त्या माउलीने किती खस्ता खाल्ल्या त्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेऊया .
खामोशी से जब भर जाओगे,तभी थोडा चीख लेना, वरना मर जाओगे!’ स्त्रीमनातील काळानुकाळ झालेली घुसमट दूर करून त्यांना व्यक्त होण्याची संधी दिली,ती पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी! प्रवाहाविरुद्ध जाऊन त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला आणि स्त्रियांना, मुलींना आत्मनिर्भरतेने जगायला शिकवले. अशा सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र आहे.
याप्रसंगी सरपंच विलास आडकमोल, आरिफ तडवी,मुराद पटेल,भरत चौधरी, परिसराचे पत्रकार फिरोज तडवी अनिल इंधाटे,लिपीक किसन तायडे,शिपाई सलीम तडवी यांच्यासह ग्रामस्य उपस्थित होते,








