यावल ; – येथील एका शाळेच्या बाहेर गेट जवळ अल्पवयीन विद्यार्थींची छेड काढल्यावरून विचारण्यास गेलेल्या विद्यार्थ्यांना छेडखानी करणाऱ्याकडून मारहाण मुलीच्या फिर्यादीवरून तिन तरूणाविरूद्ध यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटनास्थळा वरून तिघ तरूण पसार झाले आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, येथील शहरात राहणारी अल्पवयीन मुलगी ही दिनांक १३ डिसेंबर बुधवार रोजी सकाळी १०,३o वाजेच्या सुमारास साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १० वि च्या शिक्षणासाठी जात असतांना साने गुरूजी विद्यालया समोर मोटरसायकलवर आलेला लोकेश सुनिल महाजन राहणार देशमुख वाडा यावल या तरुणाने विद्यार्थी समोर मोटरसायकल आडवी करून सदर अल्पयीन मुलीचा डावा हात पकड्रन माझ्याशी लव कर असे बोलुन मनास लज्जा वाटेल असे कृत केले व तिचा विनयभंग केला ,
या घटनास्थळी छेडखानी झालेल्या अल्पवयीन मुलीचा भाऊ या ठिकाणी आला व त्या तरुणास माझ्या बहीणीचे नांव का घेतले असे विचारले असता लोकेश महाजन याच्या मोटर सायकल च्या मागे बसलेल्या कहैन्या देशमुख व वैभव देशमुख यांनी मुलीच्या भावास चापटाबुक्यानी मारहाण केली. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादी वरून तिन तरूणा विरूद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत असुन घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करणार आहे .