Hindu Janjagruti Samiti | जळगाव | साक्षीदार न्यूज | हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हर घर योद्धा अभियान’ अंतर्गत दादावाडी परिसरातील श्री अष्टभुजा माता मंदिर, पिंप्राळा येथे युवतींसाठी दहा दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. हे शिबिर 27 मार्च ते 5 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात युवतींना लाठीकाठी, निशस्त्र युद्ध, नानचाकू तसेच विविध सेल्फ डिफेन्स तंत्रांचे प्रशिक्षण देण्यात आले. यासोबतच हिंदू धर्माची महानता, धर्मशिक्षण आणि समाजात वावरताना सतर्कता राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचा एकूण 77 युवतींनी लाभ घेतला. स्वसंरक्षण प्रशिक्षक कु. धनश्री दहिवदकर यांनी युवतींना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. शिबिराची सांगता 5 एप्रिल रोजी करण्यात आली.
समारोप कार्यक्रमास नगरसेवक नरेंद्र पाटील, हिंदु जनजागृती समितीच्या कु. सायली पाटील, निखिल कदम उपस्थित होते. तसेच श्री अष्टभुजा माता मंदिर देवस्थानचे अनिल बाविस्कर, जनार्दन पाटील, विठ्ठल राजोळे, प्रवीण करोडपती, मोतीराम पाटील, भगवत चोपडे, सीताराम चौधरी, लिलाधर खाचणे, अनिल पाटील, किरण पाटील, संजय तायडे, सरकारसिंह राजपूत, शिवाजी कुंभार, संजय नेहेते, रामचंद्र शर्मा यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री. अनिल बाविस्कर यांनी केले. युवतींनी नानचाकू आणि लाठीकाठीची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. सर्व सहभागी युवतींना स्वसंरक्षण प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रशस्तिपत्रक देण्यात आले. “महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना आम्ही बळी पडणार नाही आणि कुणालाही बळी पडू देणार नाही,” अशी शपथ सर्व युवतींनी घेतली.







