Talanjali | स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे ‘तालांजली’ कार्यक्रम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Talanjali | जळगाव | स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे प्रसिद्ध तबलावादक तालमणी पं. जयंत नाईक यांच्या स्मरणार्थ ‘तालांजली’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

- Advertisement -

गेल्या महिन्यात, ५ सप्टेंबर रोजी म्हणजेच शिक्षकदिनी या गुणी कलाकारांनी देह ठेवला. पं. जयंत नाईक यांचे जळगाव आकाशवाणी, चांदोरकर प्रतिष्ठान, बालगंधर्व संगीत महोत्सव तसेच जळगाव आणि नाशिकच्या सांस्कृतिक विश्वाशी अतूट नाते होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना तालविद्येचे संस्कार दिले आणि कलाक्षेत्रात आपली स्वतंत्र छाप सोडली.त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या शिष्य परिवाराकडून एकत्रित सहवादन सादर करण्यात येणार आहे. संगीतप्रेमी, जळगावकर रसिक आणि त्यांच्या कलेवर प्रेम करणाऱ्यांनी या ‘कृतज्ञता तालांजली’ कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.हा कार्यक्रम शनिवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजता भाऊंचे उद्यान, जळगाव येथे पार पडणार आहे.

Talanjali

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS